पुणे : यंदा जानेवारी ते जून या सहामाहीमध्ये पुणे पुन्हा एकदा परडवणाऱ्या घरांच्या विक्रीमध्ये देशातील प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून समोर आले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुण्यातील घरांच्या सरासरी किमती या इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत कमी आहेत. यामुळे पुणे हे राहण्यासाठी देशातील सर्वांत परवडणारे महानगर बनले आहे.
क्रेडाई पुणे मेट्रो आणि सीआरई मॅट्रिक्स यांच्या ‘पुणे हाउसिंग रिपोर्ट सप्टेंबर २०२४’मधून ही माहिती समोर आली आहे. क्रेडाई पुणे मेट्रोच्या कार्यालयात हा अहवाल सादर करण्यात आला. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता, क्रेडाई पुणे मेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे समन्वयक कपिल गांधी, व्यवस्थापन समितीचे सदस्य पुनीत ओसवाल, डेटा ॲनालिस्ट राहुल अजमेरा, हिरेन परमार आणि क्रेडाई पुणे मेट्रोचे शंभरहून अधिक सदस्य या वेळी उपस्थित होते.
आणखी वाचा-विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा! म्हणाले…
या अहवालानुसार, यंदा पहिल्या सहामाहीत पुण्यात विक्री झालेल्या घरांची सरासरी किंमत ही ७१ लाख रुपये आहे. असे असले, तरी आजही पुणे शहर हे देशातील परवडणाऱ्या शहरांच्या यादीत प्रथमस्थानी आहे. पहिल्या सहामाहीत पुण्यात ३१ हजार कोटी रुपये मूल्याच्या सुमारे ४४ हजार घरांची विक्री झाली आहे. पुण्याच्या घरांच्या विक्रीच्या एकूण मूल्यामध्ये वार्षिक १६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. याचबरोबर ग्राहकांचा कल हा मोठे घर खरेदी करण्याकडे असल्याचेही समोर आले आहे.
पुण्यात २०१९ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहामाहीत घरांची विक्री ३६ टक्के वाढली आहे. दुसरीकडे गृहखरेदीदार हे मोठ्या घरांना पसंती देत आहेत. इतर शहरांच्या तुलनेने पुणे आजही परवडणारे शहर आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांप्रमाणे याही वर्षी देशातील परवडणाऱ्या घरांच्या विक्रीमध्ये व राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पुणे आपले पहिले स्थान टिकवून आहे. -रणजित नाईकनवरे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो
अहवालातील ठळक मुद्दे
- बाणेर, महाळुंगे, पाषाण, सूस, हिंजवडी, वाकड, ताथवडे या भागात एकूण विक्रीच्या तब्बल ६० टक्के घरांची विक्री
- आंबेगाव, वारजे, कोथरूड, बावधन भागात २०२० च्या तुलनेत २०२४ च्या पहिल्या सहामाही घरांच्या किमतीत ४४ टक्के वाढ
- गेल्या ५ वर्षांत शहरात रोजगारामध्ये ८ टक्के वाढ झाली असून, वेअर हाऊस आणि कार्यालयीन जागांना मागणी वाढणार