Pune Breaking News Updates : पुणे परिसरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. वाहतुकीचे अपडेट्स, गुन्हे वृत्त, नागरी समस्या, राजकीय घडामोडी तसंच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची माहितीही इथे मिळेल…
Pune Maharashtra News LIVE Today
नारायणगाव : विघ्नहर कारखान्याच्या चेअरमनपदी सत्यशिल शेरकर यांची बिनविरोध निवड
श्री विघ्नहर कारखान्याच्या चेअरमनपदाकरीता सत्यशिल सोपानशेठ शेरकर यांचा एकमेव अर्ज दाखल होता.
…म्हणून कवी होतो टिंगलीचा विषय, डॉ. सदानंद मोरे यांच्या कवींना कानपिचक्या
पुणे : मराठी साहित्यामध्ये छंदोबद्ध कवितेइतकेच मुक्तछंदातील कवितेचेही स्थान आहे. मुक्तछंद हे स्वातंत्र्य असले तरी स्वैराचार नाही याचे भान कवींनी ठेवले पाहिजे. कविता हा अत्यंत सोपा साहित्यप्रकार आहे, असे सध्याच्या काळातील कवींना वाटते. त्यामुळेच कुणीही उठतो आणि कवी होतो. यातूनच कवी टिंगलीचा विषय होतो, अशा शब्दांत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे यांनी कवींना कानपिचक्या दिल्या.
‘येत्या वर्षभरात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रम’, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची मोठी घोषणा
पुणे : सांस्कृतिक विभागातर्फे येत्या वर्षभरात राज्यात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी रविवारी केली. ‘आगामी काळात शास्त्रीय नृत्यसंवर्धन संस्थेच्या माध्यमातून राज्यात मोठे नृत्य संकुल उभारण्यात येणार असून, त्यासाठी सांस्कृतिक विभागातर्फे मदतही करण्यात येणार आहे,’ असे शेलार यांनी सांगितले.
शिरुर तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी राजेंद्र नरवडे तर उपसभापतीपदी बाळासाहेब नागवडे यांची बिनविरोध निवड
शिरुर :- शिरुर तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी राजेंद्र उत्तम नरवडे यांची तर उपसभापतीपदी बाळासाहेब अर्जूनराव नागवडे यांची बिनविरोध निवड झाली. विधानसभा निवडणूकीनंतर होत असलेल्या या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्ष बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
शिरूरजवळ कंटेनर आणि मोटारीमध्ये भीषण अपघात; वडील-मुलीसह तीन जण मृत्युमुखी
शिरुर : न्हावरा – तळेगाव रस्त्यावर न्हावरा येथे कंटेनर आणि मोटार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात वडील आणि मुलीसह तिघांचा मृत्यू, तर एक महिला गंभीर जखमी झाली. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
शिरूरजवळ कंटेनर आणि मोटारीमध्ये भीषण अपघात; वडील-मुलीसह तीन जण मृत्युमुखी
शिरुर : न्हावरा – तळेगाव रस्त्यावर न्हावरा येथे कंटेनर आणि मोटार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात वडील आणि मुलीसह तिघांचा मृत्यू, तर एक महिला गंभीर जखमी झाली. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
राज्यात शंभर दिवसांत ४० हजार क्षयरुग्णांचा शोध! १७ जिल्हे, १३ महापालिकांमध्ये तपासणी मोहीम
पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालय हे अतिशय महत्त्वाचे आहे. दररोज हजारो रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, गेल्या १० महिन्यांपासून या रुग्णालयाचा कारभार अधांतरीच आहे. रुग्णालयाचे कामकाज प्रभारी अधिष्ठात्यांकडे असून एवढ्या काळात अद्याप पूर्णवेळ अधिष्ठाता नेमण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ या पुण्यातील असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे.
कुणाल कामराचा आबरा का डाबरा करणार : प्रमोद नाना भानगिरे
प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका गाण्यामार्फत विडंबना केली. या गाण्यात कुणाल कामरा याने एकनाथ शिंदेंचा उल्लेख गद्दार असा केला आहे. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल यांनी खार येथील कुणाल कामरा यांचा दि हॅबिटेट स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड केली. तर याप्रकरणी राहुल कनाल आणि कुणाल सरमळकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी काही वेळापूर्वी सोशल मीडियावर एक ट्विट केल आहे. कुणाल कामराचा आबरा का डाबरा करणार असा इशारा नाना भानगिरे यांनी दिला आहे.
पुण्यातील मंत्री असूनही ‘ससून’चा कारभार अधांतरीच!
पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालय हे अतिशय महत्त्वाचे आहे. दररोज हजारो रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, गेल्या १० महिन्यांपासून या रुग्णालयाचा कारभार अधांतरीच आहे. रुग्णालयाचे कामकाज प्रभारी अधिष्ठात्यांकडे असून एवढ्या काळात अद्याप पूर्णवेळ अधिष्ठाता नेमण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ या पुण्यातील असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे.
चाकूच्या धाकाने दुचाकीस्वार तरुणाची लूट, चोरट्यांच्या मारहाणीत तरुण जखमी
पुणे : चाकूच्या धाकाने दुचाकीस्वार तरुणाला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना लोहगावमधील फाॅरेस्ट पार्क परिसरात घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत तरुण जखमी झाला.
याप्रकरणी संतोष किसन राठोड (वय २१) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण लोहगावमधील फाॅरेस्ट पार्क परिसरात राहायला आहे. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दुचाकीस्वार तरुण लोहगावमधील फाॅरेस्ट पार्क रस्त्याने निघाला होता. फाॅरेस्ट पार्क परिसरात दुचाकीवरुन आलेला चाेरटा राठोड आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनांनी तरुणाला अडवले. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी त्याच्या पाकिटातील रोकड काढून घेतली. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत तरुण जखमी झाला.
घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे तपास करत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची एक कोटी ४४ लाखांची फसवणूक, पाेलिसांकडून सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : शासकीय ठेक्यात गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची एक कोटी ४३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खडकीतील ओैंध रस्ता परिसरात राहायला आहेत. आरोपींची त्यांची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्या वेळी आरोपींनी आमच्या कंपनीला शासकीय कामाचा ठेका मिळाला आहे. या कामात गुंतवणूक केल्यास दरमहा सहा ते बारा टक्के व्याज देण्यात येईल, अशी बतावणी केली. त्यानंतर आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी एक कोटी ४३ लाख ७५ हजार रुपये घेतले. महिलेने पैसे गुंतविल्यानंतर सुरुवातीला काही रक्कम परताव्यापोटी देण्यात आली. त्यानंतर महिलेला परतावा देण्यात आला नाही.
परतावा न मिळाल्याने आरोपींकडे गुंतविलेली रक्कम परत मागितली. तेव्हा आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमोले तपास करत आहेत.