Pune Breaking News Updates : राज्यातील दुसऱ्या क्रमाकांचे मोठे शहर असलेल्या पुण्यातील विविध घडामोडी तसंच पुणे परिसरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे वृत्त, नागरी समस्या, राजकीय घडामोडी तसंच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची माहितीही इथे मिळेल…

Live Updates

Pune Maharashtra News Today

15:34 (IST) 4 Apr 2025

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आदेश

पुणे : पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

सविस्तर वाचा...

14:15 (IST) 4 Apr 2025

विकसित भारत करण्याची जबाबदारी तरुणांवर, ‘डीआरडीओ’चे माजी अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांची भूमिका

पुणे : ‘एकेकाळी संरक्षण साहित्य आयात करणारा भारत आता निर्यातदार झाला आहे. देशात तरुण नवसंकल्पना विकसित करत आहेत. नवउद्यमी निर्माण होत आहेत. जागतिक स्पर्धेत टिकू शकणारी उत्पादने देशात तयार होत आहेत. येत्या काही वर्षांत ४२ टक्के कुशल मनुष्यबळ भारतीय असणार आहे. त्यामुळे देशाला विकसित करण्याची जबाबदारी तरुणांवर आहे,’ अशी भूमिका संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी मांडली.

सविस्तर वाचा...

14:15 (IST) 4 Apr 2025

अनधिकृत होर्डिंगवर आता धडक कारवाई, पीएमआरडीए प्रशासनाचा निर्णय

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी पुढील आठवड्यापासून धडक मोहीम हाती घेण्याचे निश्चित केले आहे. हिंजवडी परिसरासह राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसह अन्य प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत होर्डिंग काढण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा...

14:14 (IST) 4 Apr 2025

पुणे : कचरा प्रकल्प बंद करण्याच्या आदेशाने महापालिकेची ‘कोंडी’, प्रकल्प बंद करणे अशक्य असल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण

पुणे : ‘सूस येथील घनकचरा प्रकल्प आजच बंद करा; नाही तर या प्रकल्पाविरोधात खुर्ची टाकून बसावे लागेल,’ असा इशारा कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी महापालिका प्रशासनाला दिला.

सविस्तर वाचा...

14:14 (IST) 4 Apr 2025

अपहृत मुलाची दोन तासांत सुटका

पिंपरी : शहरात रोजगारासाठी आलेल्या बुलडाणा येथील दाम्पत्याच्या मुलाचे चिंचवड येथून अपहरण झाल्याची तक्रार दाखल होताच खंडणीविरोधी पथकाने दोन तासांत त्याची सुटका केली. त्यांच्याच गावातील ओळखीच्या व्यक्तीने मुलाचे अपहरण केल्याचे उघडकीस आले. मात्र, अपहरणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सविस्तर वाचा...

14:13 (IST) 4 Apr 2025

अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यावरून महायुतीत वाद

पुणे : अनाथ मुलीला शिक्षण देण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरून महायुतीतील शिवसेना (शिंदे) आणि अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’त वाद उफाळून आला आहे.

सविस्तर वाचा...

14:12 (IST) 4 Apr 2025

गोखले संस्थेच्या कुलपतिपदावरून तिढा, संजीव सन्याल यांना हटविल्याचे हिंदसेवक समाज संस्थेचे यूजीसीला पत्र

पुणे : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था विद्यापीठाच्या कुलपतिपदी डॉ. संजीव सन्याल यांच्या जागी माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांची नियुक्ती केल्याचे पत्र गोखले संस्थेची मातृसंस्था असलेल्या हिंदसेवक संघाचे अध्यक्ष दामोदर साहू यांनी गुरुवारी विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) दिले.

सविस्तर वाचा....

14:03 (IST) 4 Apr 2025

पुणे : महापालिकेचा कत्तलखाना बंद करण्याचा इशारा, नियमांचे पालन होत नसल्याने प्रदूषण मंडळाकडून खडे बोल

पुणे : महापालिकेच्या कोंढवा येथील कत्तलखान्यात नियमांचे पालन होत नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) महापालिकेला कत्तलखाना बंद करण्याचा इशारा दिला. पंधरा दिवसांत आवश्यक त्या उपाययोजना करण्याची ग्वाही महापालिकेकडून देण्यात आल्याने कत्तलखान्यावरील कारवाई तूर्तास टळली आहे.

सविस्तर वाचा....

14:02 (IST) 4 Apr 2025

पुणे महापालिकेचा तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित, पहिल्याच दिवशी ४५ तक्रारी अतिरिक्त आयुक्तांनी ऐकल्या

पुणे : पुणे महापालिकेत नागरिकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी सुरू करण्यात आलेला तक्रार निवारण कक्ष गुरुवारी सुरू झाला. पहिल्याच दिवशी या कक्षाच्या माध्यमातून ४५ तक्रारी आल्या. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. अतिक्रमण, रस्ते, तसेच कचरा अशा तक्रारींचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होता.

सविस्तर वाचा....

14:02 (IST) 4 Apr 2025

सुरक्षेसाठी बँक अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे, मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेकडून मारहाण झाल्यानंतर संघटनेचे पत्र

पुणे : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बँक ऑफ महाराष्ट्रच्या (महाबँक) अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. बँक अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबत सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

सविस्तर वाचा...

14:01 (IST) 4 Apr 2025

पुणे विमानतळावरून प्रवाशांंची कोटींची ‘उड्डाणे’, एक कोटी प्रवाशांचा टप्पा पार

पुणे : पुणे विमानतळाचे विस्तारीकरण, आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे आणि नवीन टर्मिनल यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली असून, गेल्या वर्षभरात प्रथमच एक कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडला गेला आहे. त्यामध्ये प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासापेक्षा देशांतर्गत प्रवासाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा....

14:00 (IST) 4 Apr 2025

हडपसरमधील गुंड टिपू पठाणसह साथीदारांविरुद्ध गुन्हा, महिलेला धमकावून जमीन बळकाविण्याचा प्रयत्न

पुणे : हडपसरमधील सय्यदनगर परिसरातील एका महिलेला धमकावून जमीन बळकाविणे, तसेच २० लाखांची खंडणी मागतिल्याप्रकरणी गुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पठाण टोळीची हडपसरमधील सय्यदनगर भागात दहशत असून, यापूर्वी त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा...

14:00 (IST) 4 Apr 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये अवकाळी पाऊस

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरास गुरुवारी (३ एप्रिल) सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने झोडपले. सव्वातास झालेल्या पावसाने पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. या पावसाने दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पावसामुळे पिंपळे गुरव व वाकड येथे झाडपडीच्या घटना घडल्या.

सविस्तर वाचा....

13:58 (IST) 4 Apr 2025

पुणे : पाटील इस्टेट भागात वाहनांची तोडफोड

पुणे : मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट भागातील महात्मा गांधी वसाहतीत टोळक्याने कोयते उगारून तीन ते चार दुचाकींची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा....