पुणे : भाजपा खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळापासून रिक्त असलेली पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले. त्यानंतर तातडीने दुपारीच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख दिल्ली येथे रवाना झाले. जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक अधिकारीदेखील असतात. त्यामुळे डॉ. देशमुख हे तातडीने दिल्लीला गेल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच चर्चा सुरू झाली.

पोटनिवडणूक न घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची कृती बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचा दावा करणारी आणि पोटनिवडणुकीच्या आदेशाची मागणी करणारी याचिका पुणेस्थित सुघोष जोशी यांनी केली होती. त्यावर सुनावणी होऊन पोटनिवडणूक न घेण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाने फटकारत निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.

dharashiv vidhan sabha election 2024
आपल्या भविष्याचा विचार करणार्‍याच्या पाठीशी उभे रहा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आवाहन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nirmala sitharaman to meet states finance ministers for budget preparation
निर्मला सीतारामन अर्थसंकल्पाच्या तयारीला, राज्यांच्या अर्थमंत्र्यांची भेट घेणार! जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी मसलतही विषयपत्रिकेवर
devendra fadnavis in kalyan east assembly constituency election
कल्याण : विषय संपल्याने रडारड करणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी रहा; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत

हेही वाचा – सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ ते १२ जानेवारीदरम्यान, काय आहे मार्गदर्शक सूचनांमध्ये?

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख हे नेहमीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी दुपारपर्यंत कामकाज केले. उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख हे तातडीने लोहगाव विमानतळावरून विमानाने दिल्ली येथे गेले. देशमुख हे दोन दिवस दिल्ली येथेच असणार आहे. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर समजले, की जिल्हाधिकारी डॉ. देशमुख हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यांचा दिल्ली दौरा हा पूर्वनियोजित होता.

हेही वाचा – पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजी नगर परिसरात कारवाई

देशभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानुसार डॉ. देशमुख दिल्लीला गेले असून, पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि डॉ. देशमुख यांचा दिल्ली दौरा यांचा परस्पर संबंध नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.