पुणे- लोणावळा लोहमार्गावर मळवली ते कामशेत दरम्यान काम हाती घेण्यात येणार असून गुरुवारी (२२ डिसेंबर) आणि शुक्रवारी (२३ डिसेंबर) पुणे-लोणावळा लोकल सेवेसह रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. लोकल सेवेसह रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. काही रेल्वे गाड्या उशीराने धावणार आहेत. शुक्रवारी (२३ डिसेंबर) पुणे-लोणावळा लोकल सेवेच्या काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> फोन टॅपिंग प्रकरण: रश्मी शुक्लांविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास बंद करण्याबाबतचा अहवाल न्यायालयाने फेटाळला
रेल्वेकडून मळवली ते कामशेत दरम्यान विविध कामे केली जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (२२ डिसेंबर) पुणे- भुसावळ गाडी रद्द करण्यात आली आहे तसेच शुक्रवारी (२३ डिसेंबर) पुणे- भुसावळ, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, पुणे-लोणावळ दरम्यान सकाळी ११ वाजून १७ मिनिटे, दुपारी तीन वाजता, दुपारी चार वाजून २५ मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल सेवेच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. पुणे-तळेगाव, लोणावळा-पुणे, तळेगाव-पुणे दरम्यानची लाेकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. शुक्रवारी (२३ डिसेंबर) दुरांतो एक्सप्रेससकाळी ११ वाजून १० मिनिटांऐवजी दुपारी चार वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. दौंड एक्सप्रेस एक तास उशीराने दुपारी तीन वाजता रवाना होईल. चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनल गाडीला उशीराने मार्गस्थ होईल. शनिवारी (२४ डिसेंबर) भुसावळ- पुणे एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.