मुंबईप्रमाणे स्वयंचलित सिग्नल यंत्रणा; ३० किलोमीटरचे काम पूर्ण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबईप्रमाणे पुणे- लोणावळा लोहमार्गावरही अत्याधुनिक स्वयंचलित सिग्नल यंत्रणा (ऑटो ब्लॉक सिग्नल) बसविण्यात येत असून, त्याचे जवळपास पन्नास टक्के म्हणजेच ३० किलोमीटपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. या पट्टय़ामध्ये ही यंत्रणा कार्यान्वितही करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात उर्वरित काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे- लोणावळा लोहमार्गावरील प्रवास वेगवान होऊ शकणार आहे.
पुणे- मुंबई मार्गावर रेल्वेची व्यस्त वाहतूक लक्षात घेता पुणे ते लोणावळा मार्गाचे विस्तारीकरण करण्याचा प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पाला मोठा कालावधी लागणार आहे. सद्य:स्थितीत या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने स्वयंचलित सिग्नल यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. लोणावळ्यापासून या कामाला मागील वर्षांपासून सुरुवात करण्यात आली आहे. शनिवार किंवा रविवारी काही वेळ वाहतूक बंद ठेवून या यंत्रणेचे काम करण्यात येत आहे. ११ मार्चलाही दुपारी याच कामासाठी काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
सद्य:स्थितीत लोणावळा ते तळेगाव या सुमारे ३० किलोमीटर पट्टय़ातील अत्याधुनिक स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर या टप्प्यामध्ये ही यंत्रणा सुरूही करण्यात आली आहे. पुढील टप्प्यामध्ये तळेगाव ते पुणे या टप्प्यामध्ये हे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागेल. संपूर्ण मार्गावरील काम पूर्ण झाल्यास मुंबईप्रमाणे या मार्गावरही एकापाठोपाठ एक गाडय़ा सोडणे शक्य होईल. गाडय़ांचे वेळापत्रक सुधारण्याबरोबरच गाडय़ांचा वेग वाढून प्रवासाचा वेळही कमी होऊ शकणार आहे.
अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा नेमकी काय?
अत्याधुनिक स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमध्ये (ऑटो ब्लॉक सिग्नल) प्रत्येक एका किलोमीटरला सिग्नल उभारण्यात येत आहेत. सध्याच्या यंत्रणेमध्ये पुण्याहून मुंबईला निघालेली एखादी गाडी शिवाजीनगर स्थानकातून पुढे जात नाही तोवर पुण्याहून या मार्गावर दुसरी गाडी सोडली जात नाही. नवे सिग्नल पूर्णपणे स्वयंचलित आणि प्रत्येक किलोमीटरला असल्याने गाडीने संबंधित सिग्नल पार केल्यानंतर लगेचच तिच्या मागे दुसरी गाडी सोडणे शक्य होईल. त्यामुळे केवळ एक किलोमीटरच्या अंतरावर एकाच मार्गावर एकापाठोपाठ गाडय़ा धावू शकतील.
लोणावळा ते तळेगाव या टप्प्यामध्ये ऑटो ब्लॉक सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्यात येत्या सहा महिन्यांमध्ये तळेगाव ते पुणे या टप्प्यातील काम करण्यात येणार आहे. या योजनेत प्रत्येक किलोमीटरला सिग्नल बसविण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वेची वाहतूक अधिक सुरळीत आणि वेगवान होणार आहे.
– मनोज झंवर, पुणे रेल्वे, जनसंपर्क अधिकारी