पिंपरी : पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पुणे महामेट्रोने सर्वंकष वाहतूक आराखडा (काँप्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. पुढील सहा महिन्यांत त्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर मेट्रोचे नवीन मार्ग करण्यात येणार असून, निगडी ते हिंजवडी अशी नवीन मेट्रो मार्गिका तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

वर्षाला सव्वालाख लोकसंख्येची भर पडत आहे. त्यामुळे वाहतुकीचे सर्वेक्षण आवश्यक आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावरून तासाला दुचाकी, चारचाकी, बस, ट्रक, तीनचाकी अशी किती वाहने धावतात. कोणत्या दिशेने जातात. पादचाऱ्यांचे प्रमाण किती आहे. विशिष्ट वेळेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे हे सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्या मार्गावर जास्त वर्दळ राहील याचा अंदाज घेऊन नवीन मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे. मेट्रोचे कासारवाडी स्थानक वर्दळीचे आहे. नाशिक फाटा येथून नाशिकला आणि चाकणला जाणाऱ्या लोकांची संख्या किती याचा अभ्यास केला जाणार आहे. नाशिक फाटा ते चाकण आणि वर्तुळाकार रस्त्यांवर (एचसीएमटीआर) ‘निओ मेट्रो’ विकसित करण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Heavy Vehicles Ban on Ghodbunder Road for metro work
घोडबंदर मार्गावर मेट्रोच्या कामासाठी अवजड वाहतूकीला बंदी; ठाणे वाहतूक पोलिसांनी काढली अधिसुचना
Union Carbide waste disposal issue
‘युनियन कार्बाईड’च्या कचऱ्याचा प्रश्न उग्र का झाला? हा कचरा मूळ वायूइतकाच अतिधोकादायक? दुर्घटनेची शक्यता किती?
mmrda planned various road projects to solve traffic congestion problem in thane kalyan and navi mumbai
ठाणे, कल्याण, नवी मुंबईतील रस्ते प्रकल्पांना गती; वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत पार पडली महत्वाची बैठक
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार
Fast paced concreting on Madh Marve road in Malad is causing traffic congection
मढ मार्वे मार्गावरील रस्ते कामात नियोजनाचा अभाव, वाहतूक कोंडीमुळे पाऊण तासाच्या प्रवासासाठी अडीच तास प्रतीक्षा
maxi cabs in Mumbai
मॅक्सी कॅबसारखी वाहने अधिकृत झाल्यास रस्ते सुरक्षेसाठी धोक्याचे, एसटी महामंडळाची सेवा कोलमडण्याची भिती

हेही वाचा : पिंपरी : नव्याकोऱ्या तारांगणाला अवघ्या पाच महिन्यांत गळती, घुमटाच्या दुरुस्तीसाठी २० लाख रुपयांचा खर्च

प्रवासी संख्या वाढण्यासाठी उद्योजकांशी चर्चा

पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक कंपन्यांमधील अनेक कामगार पुण्यातून कंपनीच्या खासगी बसने प्रवास करतात. या कामगारांनी मेट्रोने प्रवास करावा यासाठी त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. कामगारांनी वल्लभनगरपर्यंत मेट्रोने आणि तेथून खासगी बसने प्रवास करावा, असे प्रयत्न सुरू आहेत.

मेट्रो स्थानकापर्यंत पायीच येणे अपेक्षित

दिल्लीत लोक पायी, सार्वजनिक वाहतुकीने मेट्रो स्थानकापर्यंत येतात. त्यामुळे तेथील मेट्रोला प्रतिसाद मिळतो. मेट्रो स्थानकावर वाहनतळाची व्यवस्था करणे कठीण आहे. नागरिकांनी मेट्रो स्थानकापर्यंत पायीच येणे अपेक्षित आहे. त्यासाठी पादचारी मार्ग विकसित केले जात आहेत. स्थानकापर्यंत येण्यासाठी पीएमपी, रिक्षाची व्यवस्था सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : पिंपरीत डेंग्यूचा डंख… चार महिन्यांत २२९ रुग्ण

“निगडीपर्यंतच्या मेट्रो कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. जागेची काही अडचण नाही. स्थानकांवर येण्या-जाण्यासाठीच भूसंपादन करावे लागणार आहे. तीन महिन्यांत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. साडेतीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.” – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, पुणे महामेट्रो

Story img Loader