पुणे : महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रचारासाठी येत्या गुरुवारी (२५ एप्रिल) नदीपात्रात सभा होणार आहे. ओंकारेश्वर मंदिराजवळील जागेत सभा घेण्याचे नियोजित असून त्यादृष्टीने नदीपात्रातील जागेची चाचपणी सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला येथील निवडणूक कार्यालाच्या उद्घाटनप्रसंगी नदीपात्रात सभा होणार असल्याचे जाहीर केले.

पुणे लोकसभेसाठी महायुतीचे मुरलीधर मोहोळ उमेदवार असून ते येत्या गुरुवारी (२५ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापासून रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचा समारोप नदीपात्रात करण्यात येणार असून, तेथे ही सभा घेण्यात येईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे अन्य पदाधिकारी या सभेला उपस्थित राहणार आहेत. तसेच महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे या सभेला उपस्थित राहणार आहेत.

ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
pm narendra modi interacted online with around one lakh booth chiefs
मतदारांशी प्रेमाने संवाद साधा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील बूथप्रमुखांना अनेक सूचना
Collective transportation of voters to voting center in vehicles will be crime
सावधान! केंद्रावर मतदारांची ने-आण करणे गुन्हा, शेवटच्या ४८ तासांतही प्रचार, पण…
tumsar assembly constituency
तुमसर विधानसभेत जात, पक्ष अन् चिन्ह दुय्यम स्थानी; उमेदवारच केंद्रस्थानी !
Thane district Pipani trumpet election symbol NCP Sharad Pawar
ठाणे जिल्ह्यात ‘पिपाणी’मुळे ‘तुतारी वाजविणाऱ्यां’ची डोकेदुखी ?

हेही वाचा – हडपसर भागात गोळीबाराची अफवा; पोलिसांची धावपळ

बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी गेल्या गुरुवारी (१८ एप्रिल) रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर विधान भवन परिसरात महायुतीची सभा झाली होती. मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे आज, सोमवारी (२२ एप्रिल) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ पुढील गुरुवारी (२५ एप्रिल) अर्ज दाखल करणार आहेत.

हेही वाचा – मावळमध्ये महायुतीचे आज शक्तिप्रदर्शन

नदीपात्रातील सभेसाठी जागा पाहणी सुरू आहे. नदीपात्रात सभा कुठे घ्यायची, याचा निर्णय सोमवारी होईल. त्यानुसार सभेचे नियोजन केले जाईल. – धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप