Pavana River Rescue Drama: पत्नीच्या भांडणाला कंटाळून ४५ वर्षीय पतीने शनिवारी पुण्यातील पवना नदीत उडी घेतली. त्यानंतर संबंधित इसमाला शोधण्यासाठी आठ तास बचाव मोहीम राबविली गेली. मात्र पतीचा शोध घेण्यात अपयश आल्यानंतर बचाव कार्य थांबविले गेले. मात्र आठ तासानंतर पती नदीतून सुखरूप बाहेर आल्यामुळे आता अग्निशमन दल आणि पोलीस स्तब्ध झाले आहेत. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत इतका वेळ तो जिवंत कसा काय राहिला? असा प्रश्न बचाव पथकाला पडला आहे. तर आपला माणूस जिवंत परतल्यामुळे कुटुंबिय आनंदात आहेत.

नेमके प्रकरण काय?

चिंचवड येथील आबासाहेब केशव पवार (वय ४५) यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता वाल्हेकरवाडी येथील जाधव घाटावरून पवना नदीत उडी घेतली. यानंतर पवार कुटुंबियांनी याची माहिती पोलिसांना दिली. तसेच पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. पवार हे मद्यपी असून त्यावरून पत्नीशी त्यांचे सतत भांडण होत होते, अशी माहिती घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना देण्यात आली.

Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
Natasa Stankovic reacts On Divorce From Hardik Pandya
घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच नताशा हार्दिक पंड्याबाबत म्हणाली, “आम्ही अजूनही…”
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य

हे वाचा >> Man Inhales Cockroach: झोपेत श्वास घेताना झुरळ नाकात घुसलं; पुढं झाली बिकट अवस्था, अखेर…

अग्निशमन दल, नागरी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि मावळमधील स्वयंसेवी संस्थांनी पवार यांना शोधण्यासाठी बचावकार्य हाती घेतले. अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले यांनी सांगितले की, नदीतील झुडुपाच्या फांदीला आम्हाला पवार यांचे शर्ट लटकल्याचे दिसले. त्यामुळे आम्ही नदीच्या किनारी असलेल्या झाडा-झुडुपातही खूप शोध घेतला. पण पवार कुठेच आढळून आले नाहीत.

आबासाहेब पवार यांना नदीत उडी घेताना त्यांच्या घरातील लोकांनी प्रत्यक्ष पाहिले होते. पवना धरणातून नदीत ४००० क्युसेक पाणी सोडल्यामुळे नदी जोरदार वेगाने दुथडी भरून वाहत होती. नदीत उडी मारल्यानंतर पवार नदीत वाहत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गौतम इंगवले यांनी पुढे सांगितले की, पवार पोहण्यात पटाईत असल्यामुळे ते काही अंतरापर्यंत पोहत गेले. नदीच्या काठावर परतत असताना ते दाट झाडी असलेल्या झुडुपात अडकले. या झाडीतच ते असावेत असा अंदाज बांधून आम्ही शोध घेतला. पण आम्हाला मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत.

हे ही वाचा >> “आईसाठी तरी हे नको…” तरुणाने प्रसिद्धीसाठी केला जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर बचाव पथकाने बचाव कार्य थांबविले आणि ते निघून गेले. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या आसपास पोलिसांनी अग्निशमन दलाला फोन करून पवार नदीपात्रात सापडले असल्याचे सांगितले. तसेच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. गौतम इंगवले म्हणाले की, पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांना ते कसे वाचले, याची माहिती दिली. झुडुपात ते एका झाडाच्या फांदीला धरून राहिले होते. पण ते इतका वेळ पाण्यात कसे राहू शकले, यावर आमचाही विश्वास बसत नाही आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार पाण्यातून बाहेर आल्यानंतर थरथर कापत होते.