पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपींना कोयते, तसेच पिस्तूल पुरविल्याप्रकरणी गुन्हे शाखेने एकाला अटक केली. संगम संपत वाघमारे (वय २०, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आंदेकर यांच्या बहिणीलाही अटक करण्यात आली असून, तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – बारामतीमधून उभे न राहिलेलेच बरे! अजित पवार यांचे विधान; ‘तुम्हीच आमदार हवे,’ असा कार्यकर्त्यांचा आग्रह

हेही वाचा – इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी या नद्या प्रदूषणमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

खून प्रकरणाचा गुन्हे शाखेकडून सखोल तपास करण्यात येत आहे. आरोपींना शस्त्रे पुरविण्यात वाघमारे सामील होता. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, हवालदार जाधव, मोकाशी यांच्या पथकाने सापळा लावून वाघमारेला पकडले. वाघमारेला अटक करून रविवारी न्यायलायात हजर करण्यात आले. त्याला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.