पुणे : सुश्रुषेसाठी ठेवलेल्या कामगाराकडून मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून कामगाराला अटक करण्यात आली.याबाबत एका पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, सुश्रुषेसाठी ठेवलेल्या ३४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय पीडित महिला मनोरुग्ण आहे. आरोपीला सुश्रृषेसाठी ठेवण्यात आले होते.

मनोरुग्ण महिलेला धमकावून त्याने तिच्यावर बलात्कार केला. ३ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान त्याने महिलेला धमकावून वेळोवेळी बलात्कार केला. महिला मनोरुग्ण असल्याने सुरुवातीला तिने या घटनेची माहिती दिली नाही. अखेर तिने याबाबतची दिली. त्यानंतर आरोपी तरुणाला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता देवकाते यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम तपास करत आहेत.

Story img Loader