पुणे : मेफेड्रोन तयार करण्यासाठी कच्चा माल पुरविणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखेने कर्नाटकातून अटक केली. आरोपीने कुरुकुंभ येथील कारखान्यात मेफेड्रोन तयार करण्यासाठी कच्चा माल पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पप्पू उर्फ मोहम्मद कुतुब कुरेशी (वय ४७, रा. केसनंद, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोमवार पेठेतील मेफेड्रोन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या गुंडाला गुन्हे शाखेने पकडले. त्यानंतर पोलिसांनी विश्रांतवाडी, दिल्ली, सांगली, तसेच कुरकुंभ येथील कारखान्यात छापे टाकून तीन हजार ७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार दिल्लीतील संदीप धुनिया असल्याचे तपासात उघडकीस आले. धुनिया नेपाळमार्गे कुवेतला पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली. याप्रकरणी आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, सहाजणांना शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा…बारामतीतील ‘नमो महारोजगार मेळाव्या’कडे बेरोजगारांची पाठ

आरोपी पप्पू कुरेशी मेफेड्रोन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल कुरकुंभ येथील कारखाना मालकाला पुरवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. कुरेशी पसार झाला होता. तो कर्नाटकातील यादगिर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून यादगिरमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५२ हजारांची रोकड आणि दोन मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. कुरेशीला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.