पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पातील पहिली मेट्रो पुण्यात दाखल झाली आहे. अलस्टॉम या कंपनीने श्रीसिटी (आंध्रप्रदेश) येथील कारखान्यात विकसित केलेली ही तीन डब्यांची मेट्रो ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनवटीची आहे. ही मेट्रो रविवारी (२ जून) या मार्गिकेच्या माण येथील आगारात दाखल होणार आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : तळेगाव दाभाडेच्या मुख्याधिकाऱ्यांनी रस्त्यावरील दोन मोटारींना ठोकरले, मद्यपान केल्याची शक्यता; रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुख्याधिकारी ताब्यात

Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील प्रकल्पाचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्याच्या कार्यान्वयासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष हेतू वहन कंपनीची (एसपीव्ही) स्थापना करण्यात आली आहे. टाटा समूहाच्या वतीने ‘अलस्टॉम’ कंपनीला या प्रकल्पासाठी प्रत्येकी तीन डबे असलेल्या एकूण २२ ट्रेनचा संच उपलब्ध करून देण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ताशी ८५ किलोमीटर इतक्या कमाल वेगाने धावू शकणाऱ्या या प्रत्येक ट्रेनमधून एका फेरीत तब्बल एक हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर दररोज प्रवास करताना पुणेकरांना अतिशय सुखद अनुभूती मिळावी, या दृष्टीने या गाड्यांचे आरेखन करण्यात आले आहे. या गाड्यांची अंतर्गत रचना आणि सजावट करताना प्रवाशांच्या गरजा आणि आराम याकडे विशेष लक्ष पुरविले आहे. रंगसंगती, आकर्षक आरेखन, शारीरिक विकलांग प्रवाशांना सुलभता प्राप्त करून देणारी रचना आहे, असे पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या संचालिका नेहा पंडित यांनी सांगितले.