पुणे : पुणे मेट्रोच्या विस्तारित सेवेला प्रवाशांनी स्वातंत्र्यदिनी मोठा प्रतिसाद दिला. मेट्रोने मंगळवारी (ता.१५) एकूण १ लाख २३ हजार जणांनी प्रवास केला. मेट्रोची आतापर्यंतची ही उच्चांकी प्रवासी संख्या आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय मार्गावर मंगळवारी ६१ हजार ८३४ प्रवासी होते. वनाझ ते रुबी हॉल या मार्गावर ६१ हजार ८८६ प्रवासी संख्या होती. आता मेट्रोने १ लाख २३ हजारांची उच्चांकी प्रवासी संख्या नोंदविली आहे. याआधी मेट्रोने ६ ऑगस्टला ९६ हजार ४९८ एवढी उच्चांकी प्रवासी संख्या नोंदविली होती. मेट्रोची विस्तारित सेवा सुरू झाल्यापासून रोजची सरासरी प्रवासी संख्या सुमारे ३५ हजारांवर गेली आहे.

vehicle got stuck on the railway track due to gravel stone at mothagaon village in dombivli
डोंबिवली मोठागाव रेल्वे फाटकात खडी टाकल्याने वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले, दुचाकी स्वारांची सर्वाधिक अडचण
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह…
Nashik State Transport Department will run extra bus during diwali
दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा
woman dies after falling from local train Incident between ambernath badlapur station
लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू ; अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यानची घटना
railways reappointing retired employees
निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! २५ हजार जणांना पुन्हा कामावर घेणार, कारण काय?
suburban train derails
लोकल घसरल्याने १०० फेऱ्या रद्द l कल्याणजवळची घटना, लाखो प्रवाशांचे हाल
Job Opportunity Vacancies in Railway Recruitment Board career news
नोकरीची संधी: रेल्वे भरती बोर्डात रिक्त पदे
Mumbai Metro 3 Introduces Free Bus Service
मेट्रो ते विमानतळ मोफत बससेवा; प्रवाशांच्या सोयीसाठी टी२ टर्मिनल मेट्रो स्थानकविमानतळ एमएमआरसीची सेवा

हेही वाचा >>> चंद्रकांतदादा पाटील यांच्या भेटीनंतर गौरव बापट यांचे पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत भाष्य, म्हणाले…

मेट्रोची विस्तारित सेवा १ ऑगस्टला सुरू झाली. वनाझ ते रुबी हॉल हा ९.७ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. आधी या मार्गावर वनाझ ते गरवारे स्थानकापर्यंत सेवा सुरू होती. नंतर गरवारे ते रुबी हॉल स्थानकापर्यंत सेवेचा विस्तार झाला. याचवेळी पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी हा मार्ग होता. नंतर हा मार्ग फुगेवाडीपासून जिल्हा न्यायालयापर्यंत विस्तारला.

सर्वाधिक गर्दीची मेट्रो स्थानके

१) पिंपरी-चिंचवड महापालिका : १८,३४९

२) जिल्हा न्यायालय : १७,३७२

३) वनाझ : ११,५८५

४) रुबी हॉल : ११,४६१

५) शिवाजीनगर : १०,७३०