पुणे : पुणे मेट्रोचे येरवडा स्थानक बुधवारपासून सुरू झाले. यामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत आणखी वाढ होणार असून, महामेट्रो मेट्रो गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता दर सात मिनिटाला गाडी उपलब्ध होणार आहे.

येरवडा मेट्रो स्थानक आजपासून सुरू झाले. याप्रसंगी महामेट्रोने पिंपरी चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय आणि वनाझ ते रामवाडी या दोन्ही मार्गिकांवर प्रवासी सेवेच्या वारंवारितेमध्ये वाढ केली आहे. सकाळी व सायंकाळी पुणे मेट्रोमध्ये जास्त गर्दी असण्याऱ्या वेळेमध्ये सकाळी ८ ते सकाळी ११ व दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोची वारंवारिता ७.५ मिनिटांवरून ७ मिनिटे करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांसाठी दर ७ मिनिटाला ट्रेन उपलब्ध होणार आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

हेही वाचा…संचालकांच्या राजकारणामुळे मार्केटयार्डातील तोलणारांची आर्थिक कोंडी, वेतन थकल्याने २६ ऑगस्टपासून काम बंद आंदोलन

मेट्रोची वारंवारिता वाढल्यामुळे दोन्ही मार्गिकांवर ४ फेऱ्यांनी वाढ होणार आहे. या आधी पिंपरी चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय या मार्गिकेवर एकूण ११३ फेऱ्या होत असत, तर आता ११७ फेऱ्या होणार आहेत. वनाझ ते रामवाडी या मार्गिकेवर एकूण ११४ फेऱ्या होत असत, तर आता ११८ फेऱ्या होणार आहेत. कमी गर्दीच्या वेळात सकाळी ६ ते सकाळी ८, सकाळी ११ ते दुपारी ४ आणि रात्री ८ ते रात्री १० या वेळेत मेट्रोची वारंवारिता हे पूर्वीप्रमाणेच १० मिनिटांची असणार आहे.

हेही वाचा…सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या सदनिकेतून नऊ लाखांचा ऐवज चोरी, कामगार अटकेत

मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये व वारंवारितेमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे. प्रवाशांचा मेट्रो स्थानकांवरील प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे. गर्दीच्या वेळेत दोन्ही मार्गिकांवर ८ फेऱ्यांची वाढ होऊन जास्तीत जास्त नागरिक मेट्रोतून प्रवास करू शकतील. – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो