जागा देण्याची महापालिकेची तयारी; नागरिकांना माहितीसाठी सुविधा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मेट्रो प्रकल्पाच्या माहिती केंद्रासाठी संभाजी उद्यानातील दोन गुंठे जागा महापालिका महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला देणार आहे. गेल्या वर्षभरापासून या माहिती केंद्रासाठी महामेट्रोकडून जागेची शोधाशोध सुरू होती. मात्र अखेर जागा देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली असल्यामुळे माहिती केंद्र सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या मार्गिकांची कामे वेगात सुरू आहेत. या प्रकल्पाची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी महामेट्रोने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी माहिती केंद्र उभारण्याचे निश्चित केले होते. नागपूरच्या धर्तीवर शहरातील मध्यवर्ती भागातील जागा या माहिती केंद्रासाठी मिळावी, अशी मागणी महामेट्रोच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे केली होती. प्रारंभी संभाजी उद्यान आणि पेशवे पार्कमधील जागा महामेट्रोकडून मागण्यात आली होती. पण ती जागा देण्यास महापालिकेने नकार दिला होता. मात्र आता संभाजी उद्यानातील दोन गुंठे जागा तीन वर्षांच्या कराराने महामेट्रोला देण्यासंदर्भात महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मान्यता दिली आहे. तसे पत्रही त्यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.
मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर या प्रकल्पाची माहिती पुणेकरांना मिळावी, तसेच शंकांचे निराकारण होण्यासाठी हे केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी महामेट्रोला वर्दळीच्या ठिकाणची जागा हवी होती. त्यामुळे पालिकेकडे संभाजी उद्यानातील जागेची मागणी करण्यात आली. मात्र, या उद्यानात बांधकामासाठी जागा नसल्यामुळे महापालिकेने ही जागा देण्यास नकार दिला होता. त्याऐवजी कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी पाणी पुरवठा केंद्रातील तीन गुंठे अथवा पेशवे उद्यनाबाहेरील पार्किंगमधील एक गुंठा जागा देण्यास तयारी दर्शविली होती. पेशवे उद्यानाची जागा दोन्ही मेट्रो मार्गापासून दूर असल्याने तर कर्वे रस्त्यावरील जागा सोयीची नसल्याने महामेट्रोकडून या जागांना नकार देण्यात आला होता. हा तिढा सोडविण्यासाठी महापालिकेत आयुक्त कुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर पोलीस चौकीमागील दोन गुंठे जागा महामेट्रोला देण्याचे निश्चित करण्यात आले.
संभाजी उद्यान सकाळी ११ते दुपारी ४ यावेळेत बंद असल्याने माहिती केंद्रही बंद ठेवावे लागेल. त्यामुळे मेट्रोकडून ती जागा नाकारण्यात आली होती. दरम्यान, पोलीस चौकीच्या मागील बाजूस बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात उद्यानात जाण्यासाठी एक लहान दार आहे. हे दार दिवसभर उघडे ठेवणे शक्?य असल्याने ही नवीन जागा निश्?िचत करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.