पुणे: शहरी विकासासाठी प्रतिष्ठेचा स्कोच पुरस्कार २०२३ मिळवल्यानंतर आता ‘पुणे मेट्रो लाईन ३’ प्रकल्पाने आणखी एक उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती व्यवसाय केंद्राशी जोडणाऱ्या ‘पुणे मेट्रो लाईन ३’ प्रकल्पाला आता आंतरराष्ट्रीय ‘यूएनईसीई पीपीपी आणि पायाभूत सुविधा पुरस्कार २०२३’ सोहळ्यात विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रशस्तिपत्र मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पुणे मेट्रो लाईन ३’ने कामकाजात दाखविलेल्या उल्लेखनीय प्रगतीसाठी आणि कामात राखलेल्या सातत्यपूर्ण गुणवत्तेसाठी आंतरराष्ट्रीय परीक्षकांच्या मंडळाने या प्रकल्पाची विशेष प्रशस्तिपत्रासाठी एकमताने निवड केली आहे. ग्रीसमधील अथेन्स येथे नुकत्याच पार पडलेल्या सातव्या ‘यूएनईसीई पीपीपी आणि पायाभूत सुविधा पुरस्कार २०२३’ समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आणखी वाचा-“होय, ही घराणेशाहीच, मी शरद पवार अन्…”, विरोधकांच्या आरोपांना सुप्रिया सुळेंचं सडेतोड प्रत्युत्तर

‘पुणे मेट्रो लाईन ३’चे विकसक असलेल्या पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या वित्तीय विभागाच्या समन्वयाने कंपनीच्या पर्यावरण, आरोग्य, सुरक्षा, बिझनेस आणि सिव्हिल विभागाने एकत्रितपणे हे यश मिळवले. त्यांना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर, उपाध्यक्षा आणि व्यवसाय प्रमुख नेहा पंडित, मुख्य वित्तीय अधिकारी अलोक गोयल आणि प्रकल्प संचालक अक्षय शर्मा यांचे मार्गदर्शन मिळाले.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या उभारणीमुळे सुलभ, वेगवान व स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या सर्वच टप्प्यांत गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत कुठलीही तडजोड न करण्याचे आमचे धोरण आहे, असे पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी सांगितले.