पुणे : पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असतानाच पावसामुळे मेट्रो स्थानके गळू लागल्याचे विदारक चित्र समोर आले. यामुळे मेट्रोच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हैदराबाद मेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ यांनी अनेक गंभीर प्रश्न मांडले आहेत. याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त करून श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात मंगळवारी (ता. २२) अनेक ठिकाणी पावसाचे पाणी गळत होते. जोरदार पाऊस नसूनही गळती सुरू झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. गळती सुरू असलेल्या भागात महामेट्रोने बॅरिकेड लावले होते. तरीही नवीन स्थानक हलक्या पावसातही गळू लागल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मेट्रो स्थानकांच्या बांधकामाच्या एकूण दर्जाबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. याआधीही पुण्यातील काही ज्येष्ठ अभियंत्यांनी मेट्रो स्थानकांच्या बांधकामाबाबत गंभीर मुद्दे मांडले होते. त्यानंतर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाकडून दुसऱ्यांदा स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यावरून मोठा गदारोळ उडाला होता.

Pune Man Expressed Unique Agitation About The Bad Roads In Pune Video goes Viral on social media
पुणेकर काकांचा नाद नाय! खराब रस्त्यांना कंटाळून महानगरपालिकेच्या गेटवर केलं पुणेरी स्टाईल आंदोलन; VIDEO व्हायरल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
Gen Z and the Lost Art of Conversation
तब्बल पाच हजार वर्षांचा इतिहास असलेला थेट मानवी संवाद हरवतोय? नेमके काय घडते आहे?
Road encroachments removed in badlapur west railway station area
बदलापुरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली; पूर्वेतील कारवाईनंतर पश्चिमेतही धडक कारवाई
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार

आणखी वाचा-रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग; रस्त्याचे ‘जीएसआय मॅपिंग’ होणार

याबाबत हैदराबाद मेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ म्हणाले, की मेट्रोच्या कामात कोठेही पारदर्शकता नाही. सुरक्षित मेट्रो हा सार्वजनिक हिताचा भाग आहे. त्यामुळे महामेट्रोने कामातील त्रुटी शोधण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करावी. या समितीने अहवाल दिल्यानंतर श्वेतपत्रिका काढण्यात यावी. आम्ही स्थानकांच्या रचनात्मक सुधारणेबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले. मेट्रोकडून यावर समाधानकारक उत्तरे देण्यात आलेली नाहीत. मेट्रोची सुरक्षा हा एकट्याचा प्रश्न नसून, तो संपूर्ण समाजाचा आहे. त्यामुळे लोकांनीही याबाबत प्रश्न विचारायला हवेत.

दुरुस्तीचे काम सुरू

जिल्हा न्यायालय स्थानकात वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हे दोन्ही मार्ग एकत्र येतात. विस्तारित सेवा सुरू झाल्यानंतर सर्वाधिक गर्दी असणारे हे स्थानक आहे. या स्थानकाच्या छतातून सूर्यप्रकाश आतमध्ये यावा, अशी रचना करण्यात आली आहे. या जाळीदार छतातून पावसाचे पाणी गळत होते. त्यामुळे महामेट्रोने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर इतरही स्थानकांचा आढावा घेतला जात आहे, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली.

आणखी वाचा- रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आता ‘तेजस्विनी’

जिल्हा न्यायालयासह काही मेट्रो स्थानकांमध्ये छोट्या-मोठ्या समस्या आढळून आल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. हे पथक प्रत्येक ठिकाणी जाऊन दुरुस्तीचे काम करीत आहे. -हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

मेट्रो स्थानकांच्या रचनात्मक सुरक्षिततेचा मुद्दा आम्ही उपस्थित केला होता. त्यावर महामेट्रोने काहीच काम केले नाही. मेट्रोच्या कामातील त्रुटी तपासण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करून श्वेतपत्रिका काढण्यात यावी. या मुद्द्यावर खुली चर्चा करण्याची आमची तयारी आहे. -विवेक गाडगीळ, माजी व्यवस्थापकीय संचालक, हैदराबाद मेट्रो

Story img Loader