पुणे : गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. मेट्रोच्या या सेवेमुळे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. शहरातील गणेशोत्सवातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी बाहेरून नागरिक मोठ्या संख्येने पुण्यात येत असतात. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या सुविधेसाठी मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मेट्रोची सेवा मध्यरात्री पर्यंत सुरू राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत चतुर्दशीच्या दिवशी (१७ सप्टेंबर) ते १८ सप्टेंबर (बुधवार) रोजी सकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत असे एकूण २४ तास मेट्रोची सेवा अखंड सुरू राहणार आहे. शनिवार (७ सप्टेंबर) ते सोमवार (९ सप्टेंबर) या दोन दिवसात मेट्रो सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत सुरू राहील. तर, मंगळवार (१० सप्टेंबर) ते सोमवार (१६ सप्टेंबर) या कालावधीत सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा : पुणे: पूजा साहित्य, सजावट खरेदीसाठी शहराच्या मध्य भागात गर्दी, नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (१८ सप्टेंबर) सकाळी सहा ते रात्री दहा अशी नियमित सेवा सुरू राहणार आहे. अनंत चतुर्दशी आणि दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर दोन दिवसात मेट्रोची अखंड चाळीस तास सेवा सुरू असेल. मेट्रोच्या या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune metro passenger service will continue till midnight during ganeshotsav 2024 pune print news apk 13 css