पुणे : पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या विस्तारित मार्गामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत २० हजारांची वाढ झाली आहे. यामुळे मेट्रोची एकूण दैनंदिन प्रवासी संख्या सरासरी ८० हजारांवर पोहोचली आहे. या मार्गावरील येरवडा स्थानक अद्याप सुरू झाले नसून ते सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत आणखी वाढ होणार आहे.

रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे ६ मार्चला केले. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या आधी सुमारे ६० हजार होती. रामवाडीपर्यंत विस्तारित मार्ग सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या ८० हजारांवर पोहोचली आहे. विस्तारित मार्ग सुरू होण्याआधी मेट्रोचे दैनंदिन उत्पन्न सुमारे १० लाख रुपये होते. आता मेट्रोचे दैनंदिन उत्पन्न १२ लाख ५० हजार रुपयांवर पोहोचले आहे.

dahanu to jawhar road potholes
डहाणू-जव्हार मार्गाची दुरवस्था; खड्डे, चिखलामुळे वाहनचालक त्रस्त, तातडीने कार्यवाहीची मागणी
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
in kalyan Overcrowding and heavy bags caused commuter deaths from hanging at local train doors
गर्दी, पाठीवरचे ओझे, वळण मार्गांमुळे डोंबिवली ते मुंब्रा वाढते रेल्वे अपघात
third bridge over Vashi Khadi, bridge Vashi Khadi open,
नवी मुंबई : वाशी खडीवरील तिसऱ्या पुलावरून आजपासू वाहतूक सुरू, टोलमुक्तीमुळे सततची वाहतूक कोंडी फुटली
Mumbai Western Railway, new local train timetable
मुंबई : १५ डबा लोकलच्या २०९ फेऱ्या, पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात आजपासून बदल
Air India buys 85 Airbus
तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या हवेतच दोन तास घिरट्या; १४० प्रवासी करत होते प्रवास; अखेर झालं सुरक्षित लँडिंग!
Traffic jam due to repair work on flyover on Mumbai Agra highway nashik news
उड्डाणपुलावरील दुरुस्ती कामामुळे गोंधळ; पूर्वकल्पना नसल्याने वाहनधारकांची गैरसोय, वाहतूक कोंडीत भर
अखेर मुंबईकरांना घडणार भुयारी मेट्रोचा प्रवास… कशी आहे आरे – बीकेसी मेट्रो मार्गिका?

हेही वाचा…शरद पवार गटाचा ‘एक देश एक निवडणूक’ला विरोध; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शपथनामा’ प्रसिद्ध

रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्थानके आहेत. हा मार्ग ५.५ किलोमीटरचा आहे. या मार्गावरील येरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराचा एक जीना नगर रस्त्यात येत असल्याने महापालिकेने तो दुसरीकडे हलविण्यास सांगितले होते. त्यानुसार महामेट्रोकडून जीना दुसरीकडे करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील सेवेतून येरवडा स्थानक सध्या वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच हे स्थानक सुरू केले जाणार आहे.

मेट्रोला प्रवाशांचा प्रतिसाद

सरासरी दैनंदिन प्रवासी – ८० हजार
सरासरी दैनंदिन उत्पन्न – १२ लाख ५० हजार रुपये

हेही वाचा…मावळमध्ये ३८ जणांचे अर्ज दाखल; ‘संजोग, वाघेरे’ नामसाधर्म्य असलेले दोन उमेदवार रिंगणात

तिकीट खिडकीवर सुटे पैसे मिळेनात

मेट्रोच्या तिकीट खिडकीवर तिकीट काढल्यानंतर सुटे पैसे परत दिले जात नसल्याचा अनुभव काही प्रवाशांनी मांडला आहे. प्रगती सांगळे नावाच्या तरुणीने १८ रुपयांचे तिकीट काढण्यासाठी ५० रुपये दिले होते. तिला ३० रुपये परत देण्यात आले. तिने २ रुपयांची मागणी केली. मात्र सुटे पैसे नसल्याचे कारण देण्यात आले. याबाबतचा व्हिडीओ तिने समाजमाध्यमावर टाकला आहे. त्यावर अनेक प्रवाशांनी असाच अनुभव आल्याचे म्हटले आहे.