सिग्नल प्रणालीच्या चाचण्यांसाठी मेट्रोची वनाज स्थानक ते गरवारे महाविद्यालय या अंतरातील प्रवासी सेवा मंगळवार आणि बुधवार (२७ आणि २८ डिसेंबर) अंशत: बंद राहणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पुणे: कोथरूड, बावधनमधील पाणीपुर‌ठा गुरुवारी बंद

मेट्रोमधील सिग्नल प्रणालीच्या चाचण्या मंगळवार आणि बुधवारी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत वनाज स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक या मार्गावर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील सेवा मंगळवारी आणि बुधवारी दुपारी दोन वाजल्यानंतर सुरू होणार आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीत मेट्रोची या अंतरातील प्रवासी सेवा बंद राहणार आहे. पिंपरी-चिचंवड महापालिका भवन स्थानक ते फुगेवाडी स्थानक या अंतरातील प्रवासी सेवेत कोणताही बदल नसून या मार्गावरील सेवा यापूर्वीप्रमाणे म्हणजे सकाळी आठ ते सायंकाळी आठ या कालावधीत नियमित सुरू राहणार आहे.