पुणे : पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या विस्तारित मार्गामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. जानेवारीच्या तुलनेत प्रवासी संख्येत मे महिन्यात सुमारे ९ लाखांची वाढ झाली आहे. यामुळे मेट्रोची सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या आता ९० हजारांवर पोहोचली आहे. दरम्यान, स्वारगेटपर्यंत मेट्रो धावण्यासाठी सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे ६ मार्चला केले. तेव्हापासून मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. विस्तारित मार्ग सुरू होण्याआधी मेट्रोची प्रवासी संख्या जानेवारी महिन्यात १७ लाख ५५ हजार, फेब्रुवारीत १७ लाख ७६ हजार होती. विस्तारित मार्ग सुरू झाल्यानंतर मार्चमध्ये प्रवासी संख्या २२ लाख ५८ हजारांवर गेली. त्यानंतर प्रवासी संख्येतील वाढ कायम राहून ती एप्रिलमध्ये २३ लाख ८१ हजार आणि मेमध्ये २६ लाख १६ हजारांवर पोहोचली आहे.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
The murder of a minor girl will be tried in a fast track court thane news
अल्पवयीन मुलीचे हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालणार
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात

हेही वाचा – पुण्यात विनानोंदणी ११ वाहने रस्त्यावर अन् ३ अल्पवयीन चालक आढळले! कल्याणीनगर अपघातानंतर आरटीओला जाग

मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या जानेवारी महिन्यात सुमारे ६० हजार होती. रामवाडीपर्यंत विस्तारित मार्ग सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या ९० हजारांवर पोहोचली आहे. विस्तारित मार्ग सुरू होण्याआधी मेट्रोचे दैनंदिन उत्पन्न सुमारे १० लाख रुपये होते. आता मेट्रोचे दैनंदिन उत्पन्न १४ लाख रुपयांवर पोहोचले आहे. मे महिन्यात मेट्रोला एकूण ४ कोटी २४ लाख ७६ हजार ४८० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

सध्या पुणे मेट्रोची सेवा पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांवर सुरू आहे. वनाझ ते रामवाडी मार्गावरील रुबी हॉल ते रामवाडी हा विस्तारित टप्पा मार्चमध्ये सुरू झाला. त्यावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्थानके आहेत. हा मार्ग ५.५ किलोमीटरचा आहे. याचबरोबर पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय मार्ग पुढे स्वारगेटपर्यंत जाणार आहे. या भूमिगत मार्गाचे काम सुरू असून, तो सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. हा मार्ग ३.६४ किलोमीटरचा आहे, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली.

हेही वाचा – पुणे: हर्नियावर फंडोप्लिकेशनद्वारे उपचार यशस्वी! जाणून घ्या या प्रक्रियेविषयी…

येरवडा स्थानक जुलैमध्ये सुरू होणार

वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराचा एक जीना नगर रस्त्यात येत असल्याने महापालिकेने तो दुसरीकडे हलविण्यास सांगितले होते. त्यानुसार महामेट्रोकडून जीना दुसरीकडे करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील सेवेतून येरवडा स्थानक सध्या वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे स्थानक जुलै महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. हे स्थानक सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत आणखी वाढ होणार आहे.

मेट्रो प्रवासी संख्या

  • जानेवारी – १७ लाख ५५ हजार
  • फेब्रुवारी – १७ लाख ७६ हजार
  • मार्च – २२ लाख ५८ हजार
  • एप्रिल – २३ लाख ८१ हजार
  • मे – २६ लाख १६ हजार

Story img Loader