पुणे : वनाझ ते रामवाडी आणि निगडी ते स्वारगेट या 33 किलो मीटरच्या पुणे मेट्रोला पुणेकर नागरिकांचा दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे.मेट्रोमध्ये अधिकाधिक नागरिकांनी प्रवास करावा,यासाठी पुणे मेट्रोकडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहे.यामुळे दिवसेंदिवस लक्षणीय प्रवासी संख्या वाढताना दिसत असून दररोज सरासरी दीड लाखाच्या घरात मेट्रोने नागरिक प्रवास करित आहे.

पण दररोज मेट्रोने प्रवास करणार्‍या नागरिकांसाठी महत्वाची माहीती समोर येत आहे. धुळवडीनिमित्त उद्या सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा बंद राहणार आणि त्यानंतर तीन ते रात्री अकरा वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहणार आहे.याबाबत पुणे मेट्रोकडून कळविण्यात आली आहे. याबाबत नागरिकांनी नोंद घेण्यात यावी,असे आवाहन देखील करण्यात आले आहे.