पुणे : पुणे मेट्रो येत्या १७ ऑगस्टपासून दररोज सकाळी ६ वाजल्यापासून धावणार आहे. वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय या दोन्ही मार्गांवरील मेट्रो सेवा एक तास लवकर सुरू करण्याचा निर्णय महामेट्रोने सोमवारी घेतला. मुंबईला जाणारे रेल्वे प्रवासी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महामेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोची सेवा सध्या सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत सुरू आहे. आता सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सेवा सुरू राहणार आहे. पुणे मेट्रोची सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी १ तास लवकर सुरू होणार आहे. हा बदल हा वनाझ स्थानक ते रुबी हॉल स्थानक आणि पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते जिल्हा न्यायालय या दोन्ही मार्गांवर करण्यात आला आहे.

Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pune city needs better mental health facilities pune
लोकजागर: शून्य शहर!
Trials underway to launch Amrut Bharat Express from Pune on four routes in North India Pune print news
पुण्यातून ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ उत्तर भारतातील चार मार्गांवर सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू
Metro 2A , Metro 7, Metro speed , Metro ,
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ सुसाट, ताशी ८० किमी वेगाने मेट्रो धावणार
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
western railway mega block Mumbai
मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक

शहरातील महाविद्यालये सकाळी लवकर सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी आणि मुंबईला सकाळी लवकर जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रेल्वे स्थानकावरून सकाळी लवकर सुटणाऱ्या गाड्या पुणेकरांना मेट्रोने जाऊन गाठता येतील. याचबरोबर इतर ठिकाणी जाणाऱ्या सकाळच्या रेल्वे गाड्या गाठणेही प्रवाशांना शक्य होईल.

अजित पवारांच्या सूचनेनंतर निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच मेट्रोने प्रवास केला होता. त्यावेळी प्रवाशांनी मेट्रो सेवा सकाळी ६ पासून सुरू करण्याची मागणी पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी महामेट्रोला याबाबत सूचना केली होती. त्यानुसार महामेट्रोने तातडीने हा निर्णय घेतला.

मेट्रोचे वेळापत्रक

वनाझ स्थानक ते रुबी हॉल मार्ग
सकाळी ६ ते ८ : दर १५ मिनिटांनी
सकाळी ८ ते ११ : दर १० मिनिटांनी
सकाळी ११ ते दुपारी ४ : दर १५ मिनिटांनी

दुपारी ४ ते रात्री ८ : दर १० मिनिटांनी
रात्री ८ ते १० : दर १५ मिनिटांनी

पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय मार्ग

सकाळी ६ ते ८ : दर १५ मिनिटांनी
सकाळी ८ ते ११ : दर १० मिनिटांनी
सकाळी ११ ते दुपारी ४ : दर १५ मिनिटांनी

दुपारी ४ ते रात्री ८ : दर १० मिनिटांनी
रात्री ८ ते १० : दर १५ मिनिटांनी

Story img Loader