पुणे : पुणे हे आता महानगर झाले आहे. गेल्या काही शतकांमध्ये या शहराची ओळख सतत बदले गेली. सोन्याचा नांगर फिरलेल्या या शहराला एकेकाळी देशाच्या राजधानीचा दर्जा होता, हे विसरायला लावणारे एवढे बदल होत गेले, की या शहराची मूळची ओळखच पुसट होत गेली. शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, माहिती तंत्रज्ञानाचे देशातील महत्त्वाचे केंद्र, उद्योग भरभराटीचे ठिकाण अशी अनेक ओळखींनी समृद्ध असलेले हे शहर आता बकालीकरणाकडे वेगाने दौड करत आहे. येथे राहणाऱ्या प्रत्येकाला त्याची सतत जाणीव होत असते आणि तो मनातल्या मनात शिव्यांच्या लाखोल्या वाहात असतो. शहर म्हणून सुनियोजित विकास ही संकल्पना या शहराने कायम धुळीला मिळवण्याचाच प्रयत्न केला. मूळच्या पुण्यातील पेठा गजबजू लागल्यानंतर तेथे वेळीच उपाययोजना करून विकासाचे नियोजन करण्यात त्या त्या काळातील राज्यकर्त्यांना अपयश आले. पेठांमधील रस्ते ना रूंद झाले, ना तेथील पाण्याची, सांडपाण्याची व्यवस्था सुधारली. चिकटून असलेली घरे मोडकळीला आली, तरी त्यांचे वासे तसेच आठवणींचे कढ काढत राहिले.

वाडे पडले आणि तिथे सिमेंटच्या इमारती उभ्या राहिल्या. मूळच्या वाड्यात जी चारदोन कुटुंबे होती, त्याच जागेवरील इमारतींमध्ये डझनावारी नवी कुटुंबे आली. तेथील नागरी सुविधांवरील ताण साहजिकच वाढला. परिणामी पेठांच्या पलीकडे जाऊन राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही. नवी पेठ वाली, पण त्याही पलीकडे हे शहर चहूबाजूंनी अस्ताव्यस्त पसरत राहिले. विकासाची ही सूज कुणाच्या लक्षात आली नाही. सहकारनगर, पानमळा, कोथरूड, पौड, शिवाजीनगर, हडपसर, विमाननगर अशी नवी विकासाची केंद्रे उभी राहिली खरी, पण तेथेही नियोजनाचा अभावच राहिल्याने नंतरच्या दोन ती दशकातच पेठांसारखी गजबज होऊ लागली. प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता आणि कर्वे रस्ता या परिसरातील बंगल्यांच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या. एकेकाळी सायकलींचे शहर अशी ख्याती मिळवलेल्या या शहरातील माणसे आणि वाहने यांच्या संख्येतील तफावत कमी होत गेली आणि त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर, पर्यावरणावर, दळणवळणावर होत गेला. पर्वतीच्या टेकडीवर झोपड्या उभ्या राहू लागल्या, तेव्हा एकाही नगरसेवकाने त्याला विरोध केला नाही. त्या झोपड्या त्यावेळच्या पुण्यात कोठूनही दिसत होत्या. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हळूहळू पर्वतीची टेकडी झोपड्यांनी व्यापून गेली. तरीही त्याचे कुणाला काही वाटले नाही.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

हेही वाचा…शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना

एवढा निबरपणा कोळून प्यायल्यानंतर त्या झोपड्यांचे धनकवडीला पुनर्वसन करण्याची भव्य योजना आखली. ती कार्यान्वित झाल्यानंतर तरी पर्वती हिरवीगार दिसेल, ही अपेक्षाही याच दुर्लक्षामुळे भंग पावली. टेकडीवरली झोपड्या तशाच राहिल्या आणि धनकवडीला सरकारमान्य पुनर्वसन मात्र झाले. शहराच्या कुठल्याही भागात फक्त बकालीकरणाच्या खुणा दिसू लागल्या. तरीही कुणाला कधी जाग आली नाही. जाग आली तरी झोपेचे सोंग घेऊन या बकालीकरणाला पाठिंबा देणाऱ्या कारभाऱ्यांना कधी मतदारांनी धडा शिकवला नाही. त्यामुळे त्यांची हिंमतही दिवसेंदिवस वाढतच गेली. या शहराचे कितीही वाटोळे केले, तरी सत्ता पदरी येतेच, या विश्वासामुळे हे शहर दिवसेंदिवस अधिकच बकाल होत राहिले. ही प्रक्रिया अजूनही सुरूच राहिली आहे. शहराचा विस्तार थांबण्याचे काही चिन्ह नाही. शहराच्या सीमा वाढवत नेत, कारभाऱ्यांनी हा बकालपणाही निर्यात केला आहे.

हेही वाचा…स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस

नागरिकांना पर्याय नाही, इच्छा असूनही विरोध करण्याची धमक नाही, कारभाऱ्यांना प्रश्न विचारण्याची ताकद नाही, हतबलतेने दमलेल्या पुणेकरांना आता कुणी वाली राहिला नाही. प्रत्येक निवडणुकीत आपणच या शहराचे वाली असल्याचा दावा करत फसवणारे अनेकजण पुणेकरांना फसवत आले आहेत. पुणेकरही फसत आले आहेत. हे असे कुठवर चालणार?mukundsangoram@gmail.com