पुणे : पुणे हे आता महानगर झाले आहे. गेल्या काही शतकांमध्ये या शहराची ओळख सतत बदले गेली. सोन्याचा नांगर फिरलेल्या या शहराला एकेकाळी देशाच्या राजधानीचा दर्जा होता, हे विसरायला लावणारे एवढे बदल होत गेले, की या शहराची मूळची ओळखच पुसट होत गेली. शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, माहिती तंत्रज्ञानाचे देशातील महत्त्वाचे केंद्र, उद्योग भरभराटीचे ठिकाण अशी अनेक ओळखींनी समृद्ध असलेले हे शहर आता बकालीकरणाकडे वेगाने दौड करत आहे. येथे राहणाऱ्या प्रत्येकाला त्याची सतत जाणीव होत असते आणि तो मनातल्या मनात शिव्यांच्या लाखोल्या वाहात असतो. शहर म्हणून सुनियोजित विकास ही संकल्पना या शहराने कायम धुळीला मिळवण्याचाच प्रयत्न केला. मूळच्या पुण्यातील पेठा गजबजू लागल्यानंतर तेथे वेळीच उपाययोजना करून विकासाचे नियोजन करण्यात त्या त्या काळातील राज्यकर्त्यांना अपयश आले. पेठांमधील रस्ते ना रूंद झाले, ना तेथील पाण्याची, सांडपाण्याची व्यवस्था सुधारली. चिकटून असलेली घरे मोडकळीला आली, तरी त्यांचे वासे तसेच आठवणींचे कढ काढत राहिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा