लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे: पुणे मेट्रो स्थानकांच्या कामातील त्रुटींचे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने केलेले परीक्षण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विद्यापीठातून बडतर्फ करण्यात आलेले सहयोगी प्राध्यापक डॉ. ईश्वर सोनार यांनी हे ऑडिट केले होते. याप्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय अखेर विद्यापीठाने घेतला आहे. याचबरोबर डॉ. ईश्वर सोनार यांनी त्रयस्थपणे मेट्रो स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले, असा खुलासाही रविवारी विद्यापीठाने केला.
याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले आहे, की सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (पूर्वीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे) शहरातीलच नव्हे, तर राज्य आणि देशातील एक अग्रमानांकित, तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी संस्था म्हणून सुपरिचित आहे. या संस्थेद्वारे अध्यापन आणि संशोधन याच्या जोडीला समाजातील तंत्रज्ञानविषयक विकास प्रकल्पांचे त्रयस्थ निरीक्षण आणि परीक्षण आदी सेवा येथील तज्ज्ञ प्राध्यापक गेली अनेक वर्षे देत आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेकविध प्रकल्प बारकाईने अभ्यासून त्यांच्यातील गुणात्मक वाढीसाठी येथील अध्यापक वर्गाचा अनुभव आणि त्याच्या विषयातील नैपुण्य याचा उपयोग करून देणे ही संस्थेची नेहमीच प्राथमिकता राहिली आहे. त्याद्वारे विविध औद्योगिक यंत्रणा, संरक्षण क्षेत्र, शासकीय व अशासकीय प्रकल्प यांच्यासाठी भरीव योगदान देता आले आहे.
आणखी वाचा- विश्लेषण: पुणे मेट्रोच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा घोळ काय आहे? सुरक्षिततेबाबत प्रश्न का उपस्थित झाले?
पुणे मेट्रो हा शहराच्या विकासाला गती प्राप्त करून देणारा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. सर्वसामान्य जनतेच्या वाहतुकीच्या महत्त्वाच्या प्रश्नावर परिपूर्ण पर्याय ठरणार आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वतीने डॉ. ईश्वर सोनार यांनी त्रयस्थ परीक्षणाचे काम स्वीकारून त्यांनी आपला प्राथमिक अहवाल पुणे महामेट्रोच्या प्रशासनाला सादर केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्राथमिक अहवालातील काही तांत्रिक बाबींसंबंधी विविध माध्यमांतून निरीक्षणे नोंदविण्यात आलेली आहेत. या बाबींची विद्यापीठ प्रशासनाने दखल तातडीने घेतली असून, या विषयातील अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापकांच्या समितीद्वारे हे परीक्षण पुन्हा करून, पुणे मेट्रोच्या प्रशासनाकडे अंतिम विस्तृत अहवाल लवकरात लवकर सादर करण्यात येईल, असे डॉ. सोनवणे यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठ त्रुटींचा घेणार शोध
मेट्रो स्थानकांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सोनार यांनी स्वीकारण्यापासून प्राथमिक अहवाल सादर करण्यापर्यंतच्या प्रक्रियेमधील त्रुटींचा शोध घेण्यासाठी विद्यापीठाने त्वरित पावले उचलली आहेत. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ हे स्वतःची प्रतिष्ठा आणि समाजमान्यता जपत, अशा घटनांची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कटिबद्ध असून, समाजास उपयुक्त सेवा देण्यास बांधील आहे, असेही कुलसचिव सोनवणे यांनी नमूद केले.