महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे विभागाच्या वतीने ४७४४ घरांची ऑनलाइन पद्धतीने सोडत जाहीर करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत या सोडतीची जाहीरात प्रसिद्ध होणार असून त्यानंतर इच्छुकांना अर्ज भरता येणार आहे. या सोडतीमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागातील घरांचा समावेश आहे.

गेल्या दोन वर्षात म्हाडा पुणे विभागाने काढलेली ही चौथी, तर या वर्षातील ही घरांची पहिली सोडत असणार आहे. पुणे विभागातील पुणे, पिंपरी चिंचवडसह सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणच्या ४७४४ एवढ्या सदनिकांसाठी ऑनलाइन पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे. जाहीरात प्रसिद्ध करून त्यानंतर इच्छुकांना घरांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. जाहीरात प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिन्याच्या मुदतीत अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.

home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
HDFC Bank loan rate hike installment of home loan car loan increase print eco news
एचडीएफसी बँकेच्या कर्जदरात वाढ; तुमच्या गृह कर्ज, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार काय?
avadhoot gupte marathi singer buy new apartment in khar mumbai area
अवधूत गुप्तेने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर! किंमत तब्बल ‘इतके’ कोटी, १६ व्या मजल्यावर आहे फ्लॅट
house lottery application, deadline, Navi Mumbai,
घरे सोडत अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढीची मागणी, आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी दिलेली मुदत अपुरी असल्याचे अनेकांचे मत

म्हाडाने जाहीर केलेल्या ४७४४ घरांमध्ये २०९२ घरे २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत उपलब्ध असणार आहेत. उर्वरीत २६८५ घरे सर्व गटांसाठी उपलब्ध होणार आहेत. सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २० टक्क्यांमध्ये पुण्यातील येरवडा, कसबा पेठ, महमंदवाडी, केशवनगर- मुंढवा, बाणेर, वाघोली, फुरसुंगी, लोहगांव, पाषाण, खराडी या भागासह पिंपरी चिंचवडमधील वाकड, थेरगाव, मुंढवा, वडमुखवाडी, ताथवडे, किवळे, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, चिखली, पुनावळे, मामुर्डी या भागांमध्ये २०९२ घरे उपलब्ध आहेत. २० टक्के योजनेंतर्गत असलेली घरे ही खासगी बांधकाम व्यावसायिकांनी विकसित केलेल्या इमारतीमध्ये आहेत. ३० ते ६० चौरस मीटर (३२० ते ४३० चौ. फूट) क्षेत्रफळाच्या आकारांची आहेत. अत्यल्प, अल्प गटांसाठी ही उपलब्ध आहेत, असेही माने पाटील यांनी सांगितले.