PUNE : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे. पुण्याची संस्कृती ही जगप्रसिद्ध आहे. येथील ऐतिहासिक वास्तू, खाद्यसंस्कृती, पुणेरी पाट्या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. येथील खाद्य संस्कृती विशेष प्रसिद्ध आहे. तुम्ही पुण्यातील मिसळ खाल्ली का? पुणेरी मिसळ ही खूप लोकप्रिय आहे. मिसळ हे नाव जरी ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते. पावाबरोबर ही मिसळ अधिक चविष्ठ वाटते. पुणेकराला आवडले असा हा पदार्थ आहे.
पुण्यात तुम्हाला अनेक ठिकाणी झणझणीत मिळस खायला मिळेल पण आज आम्ही तुम्हाला एक असे ठिकाण सांगणार आहोत जिथे अत्यंत स्वादिष्ट मिसळ मिळते. फक्त ६० रुपयांची ही मिसळ खायला लोकं तुफान गर्दी करतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांना येथे जाऊन मिसळ खायला आवडेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका टपरीवर मिसळची प्लेट सर्व्ह करताना दिसत आहे. त्यातील मिसळ दिसायला अत्यंत चविष्ठ आणि हटके दिसत आहे. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “डेक्कनमधील तुफान गर्दी असलेली मिसळ” आणि त्या खाली ही मिसळ नेमकी कुठे मिळते, याचा पत्ता लिहिलेला आहे. सर्वसाधारण मिसळची किंमत ही ९० ते १०० च्या वर असते पण या मिसळची किंमत फक्त ६० रूपये आहे. जर तुम्ही कधी पुण्यात आला तर ही स्वस्तात मस्त अशी पुणेरी मिसळ नक्की खा.
puneri_khadad या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खाल्ली आहे का पुण्यातील ही मिसळ आर डेक्कन मॉल समोर, डेक्कन, पुणे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान आहे. मी दोन वर्षापासून येथे मिसळ खातो.” तर एका युजरने लिहिलेय, “अत्यंत स्वादिष्ट आणि तोंडाला पाणी सुटेल इतकी भारी” आणखी एका युजरने लिहिलेय, “लय भारी” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.