पुणे : शहरातील प्रदूषणाची पातळी वाढल्याने आणि हवेची गुणवत्ता ढासळली असतानाही सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणाऱ्यांकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्यांविरोधात गेल्या पंचवीस दिवसांत ८० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कचरा जाळण्याचे प्रमाण वाढत असताना कारवाई मात्र संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक जागेत उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. त्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र, यापुढे नोटीस किंवा समज देण्याची कारवाई होणार नसून, थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, त्याचा वेग संथ असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – मंत्रिपदावरून हकालपट्टीच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, “छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल मनात…”

शहरात नदीपात्र, विविध घाट, पूल, नाले, राष्ट्रीय महामार्ग, कालव्यामध्ये कचरा टाकण्याचे आणि जाळण्याचे प्रमाण मोठे आहे. मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये सर्रास सुका कचरा जाळला जात आहे. मात्र, पंधरा क्षेत्रीय कार्यालयांकडून संथ गतीने कारवाई केली जात आहे. गेल्या पंचवीस दिवसांत केवळ ८० जणांवर कारवाई करून ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या २ हजार ९७५ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, आठ लाख ८३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पुणे – लोणावळा रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार, खडकी ते पुणे स्थानकांदरम्यान स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित

पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम म्हणाले, की सध्या कारवाई सुरू आहे. कारवाईचा वेग वाढविण्याची सूचना क्षेत्रीय कार्यालय आणि विशेष पथकाला करण्यात आली आहे.