मनसे नेते वसंत मोरे यांनी रविवारी ( १६ जुलै ) फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्देशून विनंती केली होती. “तुमचा राज्याभिषेक ही झालाय मनासारखे खाते ही मिळाले आहे, जरा आता आमचाही विचार करा दादा! घ्या की महानगरपालिकेच्या निवडणुका” असं आवाहन वसंत मोरे अजित पवारांना केलं होतं. त्यानंतर बोलताना त्यांनी ‘एवढं मोठं धाडस करून अजितदादा गेले म्हणजे नक्की मुख्यमंत्री होणार’ असं वक्तव्य केलं आहे.
असेच व्हिडीओ पाहण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…