पुणे : विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवित असतानाही मनसेकडून स्थानिक पातळीवर काही अपक्ष आणि अन्य पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देण्यात आल्याचे पुढे आले आहे. त्याची दखल पक्षाच्या नेत्यांनी घेतली असून, परस्पर असे निर्णय जाहीर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणूक मनसेकडून स्वबळावर लढविली जाणार आहे. त्यानुसार पुण्यातील चार मतदारसंघांसह राज्यातील अनेक मतदारसंघांत मनसेकडून उमेदवार देण्यात आले आहेत. स्वबळावर निवडणूक लढविण्यात येत असल्याने कोणत्याही अपक्ष, किंवा पक्ष आणि संघटनेच्या उमेदवारास मनसेकडून अधिकृत पाठिंबा देण्यात आलेला नाही. मात्र, काही ठिकाणी स्थानिक पातळीवर पक्षाकडून पाठिंबा देण्यात आल्याची बाब पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आढळून आली आहे.

हेही वाचा : शरद पवार यांचे बारामतीकडे विशेष लक्ष, आज बारामतीत सहा सभा

अपक्ष किंवा पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत कोणताही निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर झालेला नाही. त्याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या निर्णयाच्या पूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठिंब्यासंदर्भात कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला असेल, तर तो पक्षाचा निर्णय नाही. त्यामुळे असे परस्पर निर्णय जाहीर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मनसे नेते अनिल शिदोरे आणि राजेंद्र उर्फ बाबू वागसकर यांनी जाहीर केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune mns raj thackeray to take action who declared support to candidates without the approval of senior leaders pune print news apk 13 css