पुण्यामधील पिंपरी-चिंचवड येथे एक अजब अपघात घडला आहे. येथील पिंपरी मोबाईल मार्केटमधील एका दुकानामध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला आहे. धक्कादायक बाबमध्ये दुकानातील एका कर्मचाऱ्याने तोंडात मोबाईलची बॅटरी पकडली असतनाच ती फुटल्याने एकच गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार ‘श्री रूपम मोबाईल शॉपी’मधील कर्मचारी एका ग्राहकाच्या मोबाईलची बॅटरी चेक करत होता. तोंडामध्ये बॅटरी टाकून ती दाबण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक या बॅटरीचा स्फोट झाला. यामध्ये एकजण जखमी झाला असून त्याच्या तोंडाला जखम झाली आहे.

स्फोट झाल्यानंतर दुकानातील इतर कर्मचारी आणि दुकानाबाहेरील ग्राहक गोंधळले आणि इकडे तिकडे धावू लागल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

Story img Loader