त्या होतकरू तरुणांचे होत आहे कौतुक…
पुणे- मुंबई धृतगती मार्गावर खंडाळा घाटात केमिकलचा टँकर पलटी होऊन लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. साडेपाच तासानंतर पुणे आणि मुंबई कडील वाहतूक सुरळीत झाली आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना जेवण आणि पाण्याची व्यवस्था करणाऱ्या तरुणांच कौतुक होत आहे. दुपारी बाराच्या सुमारास खंडाळा घाटात केमिकल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला होता. केमिकलने पेट घेऊन यात चालक आणि क्लीनर चा मृत्यू झाला तर पुलाखालून जाणाऱ्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला.
हेही वाचा >>> पुणे : पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उद्या वाहतूक बदल
पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर केमिकल टँकर पलटी होऊन आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू झाला. अपघातामुळे पुणे आणि मुंबईकडील वाहतूक ठप्प झाली होती. पाच तासाहून अधिक प्रवाशी अन्न आणि पाण्याविना वाहतूक कोंडीत अडकले होते. स्थानिक तरुणांनी जेवण आणि पाणी प्रवाशांना दिले. कॅनच्या साहाय्याने दोरीने पाणी आणून प्रवाशांना दिले. यामुळे आजही माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. अेन वेळेत जेवण आणि पाणी मिळाल्याने प्रवाशी देखील सुखावले. देवप्रमाणे तरुणांनी येऊन पाणी आणि जेवण दिल्याने तरुणांचे कौतुक होत आहे.