सोन्यालाही वरचढ असणाऱ्या प्लॅटिनमची विक्री देशात जोरात सुरू असून जागतिक स्तरावर प्लॅटिनमची आयात करणारा भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. देशात चेन्नईत प्लॅटिनमच्या दागिन्यांची सर्वाधिक विक्री होत असून त्याखालोखाल गुजरातने बाजी मारली आहे. गुजरातनंतर प्लॅटिनमच्या विक्रीत मुंबई आणि पुण्याने स्थान मिळवले असून पुण्यात प्लॅटिनमच्या विक्रीच्या वाढीचा दर ३० ते ३५ टक्के आहे.
‘प्लॅटिनम गिल्ड इंटरनॅशनल’चे व्यापार व्यवस्थापक राहिल माहिमतुले यांनी ही माहिती दिली. ‘रांका ज्वेलर्स’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता आणि गायक आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा यांच्या हस्ते प्लॅटिनम दागिन्यांच्या नव्या श्रेणीचे गुरूवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
माहिमतुले म्हणाले, ‘‘सोन्यापेक्षा प्लॅटिनम धातू जवळपास दहा टक्क्य़ांनी महाग आहे. प्लॅटिनम दागिन्यांची रीटेल किंमत सोन्यापेक्षा २० ते ३० टक्क्य़ांनी अधिक आहे. असे असले तरी प्लॅटिनमच्या किमतीत सोन्याप्रमाणे फारसे चढउतार होत नसून या दागिन्यांना देशात असलेली मागणीही कायम आहे. सोन्यापेक्षा हा धातू ३० पटींनी दुर्मिळ आहे. दक्षिण आफ्रिकेतून ८५ टक्के प्लॅटिनम आयात केले जाते. जगात चीन प्लॅटिनमची सर्वाधिक आयात (५५ टन) करतो. अमेरिका आणि जपान आयातीत द्वितीय क्रमांकावर (१० ते १५ टन) तर भारत तृतीय क्रमांकावर (३ टन) आहे. प्लॅटिनम दागिन्यांमध्ये सर्वाधिक मागणी ‘प्लॅटिनम लव्ह बँड’ अंगठय़ांना आहे. या अंगठय़ा चाळीस हजार रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंत उपलब्ध असून त्यांची किंमत वजन व वापरल्या गेलेल्या हिऱ्याच्या दर्जावर ठरते.’’
देशात प्लॅटिनम दागिन्यांच्या विक्रीत मुंबई आणि पुणे तिसऱ्या क्रमांकावर
सोन्यालाही वरचढ असणाऱ्या प्लॅटिनमची विक्री देशात जोरात सुरू असून जागतिक स्तरावर प्लॅटिनमची आयात करणारा भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.
आणखी वाचा
First published on: 27-10-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune mumbai on 3rd position for selling platinum in india