पुणे : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पुणे-मुंबई दरम्यानच्या रेल्वे सेवेला सोमवारी बसला. मुंबईत खडीवली, टिटवाळा आणि कसारा या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने दोन्ही शहरांदरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. अचानक गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागांत लोहमार्गांवर पाणी साचले आहे. यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. यामुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. पुण्याहून मुंबईसाठी सुटणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या सोमवारी रद्द करण्यात आल्या. याचबरोबर मुंबईहून पुण्यासाठी सुटणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, आणि डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या.

हेही वाचा >>>अखेर ठरलं! पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलबाबत मोहोळांची मोठी घोषणा

रेल्वेने दैनंदिन पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ऐनवेळी गाड्या रद्द कऱण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक प्रवाशांना इतर पर्यायी साधनांनी प्रवास करावा लागला. रेल्वे प्रशासनाकडून पुणे-मुंबई दरम्यानच्या घाट परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. या घाट भागात पावसाळ्यात अनेक वेळा दरडी कोसळतात. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वेकडून सावधगिरीची पावले उचलली जात आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune mumbai train canceled due to heavy rain pune print news stj 05 amy
Show comments