गणेश विसर्जनासाठी महापालिकेची तयारी पूर्ण झाली असून १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३०३ विसर्जन घाटांवर प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली आहे. टिळक चौक, टिळक रस्त्यावरील आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, नारायण पेठ येथे माती गणपतीजवळ मंडप टाकण्यात आले आहेत.विसर्जन घाटांवर आणि मिरवणूक मार्गावर औषध फवारणी करण्यात आली आहे. तसेच घाटावर जीवरक्षक पथक तैनात करण्यात येणार आहे.

अग्निशामक दलाच्या वतीने प्रत्येक घाटावर अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. घाटावर, नदी किंवा तलाव येथे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना जलाशयापासून लांब ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणी पाण्यात बुडत असेल, तर त्वरित तेथे उपस्थित असणाऱ्या जीवरक्षकाला त्याची कल्पना द्यावी. क्षमतेचा अंदाज घेऊनच विसर्जनासाठी होडीमध्ये बसावे. जीवरक्षकांकडून गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.

Hadapsar fire
Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
cargo vehicle caught fire on Mumbai Ahmedabad National Highway
महामार्गावर मालवाहतूक वाहनाला भीषण आग, मालजीपाडा वासमाऱ्या पुलाजवळील घटना
Srikant Shinde road show in front of Shiv Sena Bhavan to campaign for Sada Saravankar Mumbai
शिवसेना भवनसमोरून सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे यांचा रोड शो; महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी
Seven developers application to government for withdrawal from SEZ project print eco news
सात विकासकांचा ‘सेझ’ प्रकल्पातून माघारीचा सरकारकडे अर्ज; पुणे, नागपूरच्या प्रकल्पांचाही समावेश

हेही वाचा : उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करून २४ तास व्हायच्या आतच पुरंदर विमानतळाला विरोध सुरू

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके, फिरती शौचालये, सूचना फलक या गोष्टी सज्ज करण्यात आल्या आहेत. डेक्कन जिमखाना, नूतन मराठी विद्यालयाजवळ, लक्ष्मी रस्ता या ठिकाणी मिरवणूक संपेपर्यंत स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि वाहनचालक यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. मिरवणुकीत गुलालाचा वापर करू नये. रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगाची उधळण मिरवणुकीत करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : पुणे : गणेशोत्सवात १९ ठिकाणी पार्किंगची सुविधा

आपत्कालीन परिस्थितीत साधावयाचा संपर्क

  • २५५०१२६९
  • २५५०६८००
  • २५५०६८०१
  • २५५०६८०२
  • २५५०६८०३
  • अग्निशमन दल – १०१
    आपत्ती व्यवस्थापन अधिकारी – गणेश सोनुने – ९६८९९३१५११
    अग्निशमन प्रमुख – देवेंद्र पोटफोडे – ८१०८०७७७७९
    माहिती व जनसंपर्क अधिकारी – योगेश हेंद्रे – ९९२२४०४०९९
    या क्रमांकावर नागरिकांना मदतीसाठी संपर्क साधता येणार आहे.