पुणे : महापालिकेच्या ठेक्यावरून झालेल्या वादावादीत परस्परांवर दाखल झालेल्या गुन्हे प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. परस्परांत झालेल्या हाणामारीचे मूळ प्रत्यक्षात पनवेलमधील एका बारमध्ये झालेल्या भांडणात असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील ठेका मिळविण्याच्या वादातून खडक पोलीस ठाण्यात ठेकेदार आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात ‘ठेकेदाराने रिव्हॉल्वर रोखून जीवे मारण्याची धमकी दिली,’ अशी फिर्याद भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता निर्मल हरिहर यांनी दिली होती, तर भाजप कार्यकर्त्याकडे दीड तोळ्याची सोनसाखळी मागण्यासाठी गेलो, तेव्हा मारहाण करण्यात आल्याची फिर्याद मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंता गणेश गिते यांनी पोलिसांकडे दिली होती. गंज पेठेत हा प्रकार घडला होता.

mixers juicers and tabs distribution to bandra women
‘खनिज क्षेत्र’ निधीतून मिक्सर, टॅबचे वाटप; खाणकाम उद्योगाने बाधित झालेल्यांचा निधी इतरत्र वळवण्यास विरोध
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
Sanjay Rathod case, girl suicide, High Court,
संजय राठोड प्रकरण : तपासाला आक्षेप नसल्याचा आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांचा उच्च न्यायालयात दावा
Mumbai Crime News
Mumbai Crime : लिव्ह इन पार्टनरवर बलात्कार केल्याचा आरोप, सात अटींचा करार दाखवून मिळवला जामीन, मुंबईतली घटना
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
case has been registered against two people due to filming done before the suicide
आत्महत्येपूर्वी केलेल्या चित्रीकरणामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल
kalyaninagar car accident accussed surendra agarwal for abusing and threatening to kill employee
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अगरवाल याच्यावर गुन्हा,खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
Kolkata Rape-Murder News
Kolkata Rape-Murder : कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपीच्या वकील म्हणून नियुक्त झालेल्या महिला वकील कोण?

हेही वाचा…पुणे: खडकवासला धरणातून विसर्गात वाढ, सतर्क राहण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन

मात्र, या प्रकरणापूर्वी घडलेली एक कहाणी या वादाला कारणीभूत ठरली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिते आणि त्यांचा मित्र कमलेश क्षीरसागर पनवेल येथील बिंदास ऑर्केस्ट्रा बारमध्ये २० जुलै रोजी गेले होते. त्या वेळी गिते यांच्या ओळखीचे निर्मल हरिहर चार मित्रांसोबत तेथे आले होते. मध्यरात्री सर्वजण बारमध्ये नृत्य करत असताना, निर्मल हरिहर यांनी गिते यांना धक्का दिला. त्यामुळे, ‘मला धक्का का दिला,’ अशी विचारणा गिते यांनी हरिहर यांच्याकडे केली. तेव्हा त्यांच्यात वाद झाला.

हेही वाचा…“शरद पवारांवर बोललेलं लोकांना पटत नाही, म्हणूनच अजित पवारांनी…”, रोहित पवार म्हणाले…

या घटनेनंतर गिते पुण्यात आले आणि हरिहर यांनी गळ्यातील ९० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावल्याची तक्रार त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात ई-मेलद्वारे दिली. या घटनेनंतर हरिहर आणि गिते यांच्यात गंज पेठेत पुन्हा वाद झाला. त्यातून दोघांनी परस्परविरोधी फिर्याद दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी निर्मल हरिहर (रा. २३१, गंजपेठ, पुणे) यांच्याविरुद्ध नवीन पनवेल पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला.