पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी गेले दोन महिने सुरू होती आणि निवडणूक जाहीर होताच निवडणुकीत खरा ‘राजकीय रंग’ भरू लागला आहे. या निवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच खरा सामना होणार असल्यामुळे पुण्याचे माजी पालकमंत्री अजित पवार आणि विद्यमान पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या चारही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला होता. मात्र आता आघाडी आणि युतीसाठी त्या त्या पक्षांच्या नेत्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. या चारही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आघाडी वा युती नको आहे. मात्र त्या त्या पक्षांचे नेते एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या मन:स्थितीत तूर्त तरी आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे महापालिका सभागृहात सन २०१२च्या निवडणुकीत ७६ प्रभागांमधून १५२ नगरसेवक निवडून आले होते. आगामी निवडणूक चारसदस्यीय प्रभागरचनेनुसार होत असून, शहरात ४१ प्रभाग आहेत. त्यातील ३९ प्रभागांमधून प्रत्येकी चार, तर दोन प्रभागांमधून प्रत्येकी तीन असे मिळून १६२ नगरसेवक निवडून येतील.
पक्षांतर जोरात
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार हे गृहीत धरून सर्वच पक्षांनी आणि इच्छुक उमेदवारांनी गेल्या दोन महिन्यांपासूनच निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. पाचही पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतींचा पहिला टप्पाही पूर्ण केला असून, काही उमेदवारांनी उमेदवारी मिळण्याआधीच प्रभागामध्ये प्रचारालाही सुरुवात केली आहे. अनेक नगरसेवकांचे पक्षांतरही सुरू असून आणखीही काही जण पक्षांतराच्या तयारीत आहेत. या पुढील टप्प्यातही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आणखीही काही जण त्यांचे पक्ष सोडतील.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यमान नगरसेवकांनी मोठय़ा प्रमाणावर पक्षांतर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी, अनिल टिंगरे, दिनशे धाडवे, काँग्रेसचे नगरसेवक अभिजित कदम, शीतल सावंत, सुनीता गलांडे, सुनंदा गडाळे, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, मनसेचे नगरसेवक राजेंद्र बराटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर आरपीआयच्या नगरसेविका सुनंदा देवकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेच्या नगरसेविका आशा साने आणि अर्चना कांबळे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक रईस सुंडके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या नगरसेवकांव्यतिरिक्त काँग्रेस, मनसे या पक्षांतील काही माजी नगरसेवकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनीही पक्षांतर केले आहे.
वादग्रस्त पक्षप्रवेश
या पक्षांतरामध्ये भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे वादग्रस्त ठरले आहेत. त्यांनी भाजपमध्ये ज्या नगरसेवकांना वा अन्य पक्षांतील पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिले, त्यावरून भाजपवर मोठी टीका झाली आहे. गुंडांचा पक्ष अशीही टीका भाजपवर सुरू असतानाच मोक्का आरोपातील जामिनावर सुटलेल्या विठ्ठल शेलार याला भाजपमध्ये प्रवेश देऊन भारतीय जनता युवा मोर्चाची तीन तालुक्यांची जबाबदारी दिल्याचे प्रकरण ‘लोकसत्ता’ने उजेडात आणले आणि त्या घटनेवरूनही पुण्यात भाजपला सर्वानी लक्ष्य केले. भाजपमध्ये सध्या सर्वाधिक पक्षप्रवेश होत असले तरी त्या प्रवेशांबाबत खुद्द भाजपमध्येच अस्वस्थता आहे. त्याबाबत उलटसुलट विधानेही नेत्यांनी केली आहेत. त्यामुळे नव्याने पक्षात आलेल्या सर्वाना उमेदवारी दिली जाईलच असे नाही, असे आता नेतृत्वाकडून सांगितले जात आहे.
महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीनेही निवडणुकीची तयारी गेले दोन महिने चांगल्या पद्धतीने केली असून, अजित पवार यांनी या निवडणुकीची सूत्रे त्यांच्याकडे घेतली आहेत. पुण्यासह शेजारच्या पिंपरी महापालिकेत सत्ता आणणे हे राष्ट्रवादीचे लक्ष्य आहे आणि ते साध्य करण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर आहे. त्या दृष्टीने पक्षाची तयारी सुरू असल्याचे दिसते. नव्याने काँग्रेसबरोबरच्या आघाडीची चर्चा सुरू झाली असली तरी राष्ट्रवादीची तयारी सर्व जागांवर स्वबळावर लढण्याची आहे आणि ती आधीपासूनच झालेली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनीही आघाडी करण्यात स्वारस्य दाखवले असले तरी त्यांच्या नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना आघाडी नको आहे. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको, अशी उघड भूमिका काँग्रेसकडून मांडली जाऊ लागली आहे. दुसरीकडे शहर काँग्रेसवर स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी अनेक नेत्यांची धडपड सुरू आहे आणि हेच आव्हान त्या पक्षापुढे असल्याचे दिसत आहे.
सध्या होऊ दे खर्च..
नव्या रचनेनुसार चार सदस्यांचे प्रभाग झाल्यामुळे प्रभागांचा भौगोलिक विस्तार खूप मोठा झाला आहे. एकेका प्रभागात किमान ७० ते ८० हजार लोकसंख्या आणि ३० ते ४० हजार मतदार असे चित्र आहे. प्रचारासाठी मिळणाऱ्या तीन आठवडय़ांच्या कालावधीत सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे, परिचय पत्र पोहोचवणे, चिन्ह पोहोचवणे हे आव्हान उमेदवारांपुढे आहे. त्यामुळे सध्या अनेक इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. घरोघरी पत्रकेही पोहोचवली जात आहेत. त्या बरोबरच लाखो रुपये खर्च करून दिनदर्शिकांचे वाटप तसेच लकी ड्रॉ, खेळ पैठणीचा यांसारखे कार्यक्रम, नामवंत गायकांचे संगीत महोत्सव असेही कार्यक्रम इच्छुकांकडून जोरात सुरू आहेत. उमेदवार ज्या वेळी त्याचा उमेदवारी अर्ज दाखल करेल तेव्हापासून त्याला निवडणूक खर्च सादर करण्याचे बंधन असल्यामुळे आणि निवडणूक खर्चासाठी पाच लाखांचे बंधन असल्यामुळे उमेदवार आणि नगरसेवक सध्या मोठय़ा प्रमाणावर खर्च करून मतदारांना खूश करण्याच्या प्रयत्नात आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीवर दृष्टिक्षेप
- सर्व पक्षांतील इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण. राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रकाशित
- भाजपच्या प्रारूप जाहीरनाम्याचे वाटप
- कार्यकर्त्यांचा विरोध; पण युती आणि आघाडीसाठी बैठका सुरू
- इच्छुक उमेदवारांकडून सध्या सांस्कृतिक कार्यक्रमांची खैरात