पुणे : बारावी अनु्तीर्ण असताना बनावट पदवीची कागदपत्रे जोडून सेवा पुस्तिकेत नोंद केल्याप्रकरणी महापालिकेचे तत्कालिन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे, उपायुक्त सोमानथ बनकर, लिपिकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बनकर हे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आहेत.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुधीर रामचंद्र आल्हाट (वय ५४, रा. नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त असलेले सोमनाथ बनकर हे २००८ मध्ये पुणे महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहात पर्यवेक्षक होते. त्यावेळी त्यांनी सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीमधून २००८ आणि २००९ या शैक्षणिक वर्षांमध्ये एमबीएची बनावट पदवी मिळविली. याबाबतची नोंद त्यांनी सेवा पुस्तिकेत नोंद करुन घेतली. त्यावर तत्कालिन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे यांची स्वाक्षरी होती.

Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

हेही वाचा : Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

त्यानंतर तक्रारदार आल्हाट यांनी सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीमध्ये माहिती अधिकारात अर्ज केला होता. सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीने सोमनाथ बनकर या नावाच्या कोणत्याही विद्यार्थ्याने पदवी घेतली नसून ही पदवी बनावट असल्याचे कळविले. याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज दिल्यानतंर याप्रकरणाची शहानिशा करण्यात आली. चौकशीत फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यनंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची मााहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करत आहेत.