महापालिकेकडून दिशाभूल; प्रतिदिन १५० दशलक्ष लिटर बचत नाहीच
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत बंद जलवाहिनीमुळे प्रतिदिन १०० ते १५० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होईल, हा महापालिकेचा दावा फोल ठरला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका धरणातून प्रतिदिन १३१० दशलक्ष लिटर पाणी घेत असताना बचतीचे पाणीही यात गृहीत धरण्यात आले आहे. महापलिकेचे अधिकारीही त्याला दुजोरा देत आहेत. त्यामुळे बंद जलवाहिनीमुळे कालव्यातून होणारी पाणीचोरी थांबली असली, तरी बचत मात्र होत नसल्याचे पुढे आले आहे.
खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याची चर्चा सुरू झाली. कालवा समितीच्या बैठकीतही शहराच्या पाणीपुरवठय़ामध्ये २०० दशलक्ष लिटरने कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहराला दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून यापूर्वी प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी घेण्यात येत होते. ते पाणी ११५० दशलक्ष लिटपर्यंत घेण्याचे आदेश महापलिकेला देण्यात आले. त्यानुसार पाणीपुरवठय़ाचे सुधारित वेळापत्रक पाणीपुरवठा विभागाकडून करताना महापालिका आयुक्त सौरभ राव आणि सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पर्वती ते लष्कर जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत बंद जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून त्यातून प्रतिदिन १०० ते १५० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होईल. त्यामुळे कालवा समितीच्या बैठकीत मंजूर झालेले प्रतिदिन ११५० दशलक्ष लिटर पाणी आणि बचतीतून मिळणारे पाणी लक्षात घेता महापालिकेला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार असल्याचा दावा केला होता.
डिसेंबर महिन्यात बंद जलवाहिनीची चाचणी घेऊन ती कार्यान्वित करण्यात आली. मात्र यातून प्रत्यक्ष किती पाण्याची बचत होते, याबाबत महापलिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. बचतीतून उपलब्ध झालेल्या पाण्याचा हिशेब गृहीत धरूनच सध्या १३१० दशलक्ष लिटर पाणी घेण्यात येत असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात पाण्याची बचत होत नसल्याचीही माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, जलसंपदा विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी बचतीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. बंद जलवाहिनीचे काम पूर्ण होण्यापूर्वी महापालिकेकडून होळकर जलकेंद्र आणि कालव्यातून पाणी घेतले जात होते.
पूर्व भागातील लष्कर जलकेंद्रावर अवलंबून असलेल्या लोकसंख्येला आवश्यक असलेल्या पाणीपुरवठय़ानुसार पाणी घेतल्यानंतर जलसंपदा विभागाकडून त्याचे मोजमाप केले जात होते. त्यामुळे गळतीचा प्रश्न त्या वेळीही नव्हता. आता बंद जलवाहिनीमुळे खडकवासला धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी घेण्यात येणार आहे. आवश्यक तेवढेच पाणी धरणातून घेतले जाणार आहे. मग गळतीचा प्रश्न येतोच कुठे, अशी विचारणा जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी केली आहे.
बंद जलवाहिनी
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांनीही बंद जलवाहिनीमुळे पाणीबचत होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रतिदिन १०० ते १५० दशलक्ष लिटर पाणीबचतीचा दावा फोल ठरला असून आयुक्तांसह महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी बचतीच्या मुद्दय़ावरून दिशाभूल केल्याचेही स्पष्ट झाले आहे.