एखादी नवी गोष्ट घडवून आणावी आणि चार गावगुंडांनी त्याचा बट्टय़ाबोळ करावा, हे आता पुणेकरांच्या सवयीचे झाले आहे. पण तरीही त्याविरुद्ध कोणी बोलण्यास मात्र तयार होत नाही. हेच पाहा, सायकलींचे शहर अशी असलेली पुण्याची ओळख मागे पडूनही आता खूप काळ लोटला. पीएमपीएल या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याने, पुण्यात दरडोई असलेली स्वयंचलित वाहने एकापेक्षा जास्त आहेत. तरीही सायकलींचे शहर ही ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न पुणेकरांमधील मूठभरच नालायकांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. या सायकली अतिशय कमी दरात कोणालाही उपलब्ध होतात, त्या कुठेही ठेवण्याची सोपी सोय आहे. एवढी चांगली योजना, पण मातीत कशी जाईल, यासाठीच सगळे प्रयत्न करीत राहणार. कुणी नेलेली सायकल परत देणारच नाही. कुणी बिल्डर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अशा अनेक सायकली उचलून नेणार आणि अत्यल्प दरात आपल्याच कर्मचाऱ्यांचे भले करणार. कुणी पैसेच भरणार नाही. आपली लायकीच नाही, हे असले काही चांगले स्वीकारण्याची!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा