पिंपरी : इमारतीच्या पायाचे खोदकाम करताना सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यामुळे रस्ता खचल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला महापालिकेने नोटीस बजाविली आहे. संपूर्ण दुरुस्तीचे काम होईपर्यंत बांधकाम परवानगीस स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतची नोटीस शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली. तसेच रस्त्याला लागून सुरु असलेल्या बांधकाम इमारतींच्या विकसकांना देखील नोटीसा दिल्या जाणार आहेत. 

हेही वाचा >>> पिंपरी : मनसेचे पालिकेसमोर आंदोलन… क्रिकेट स्टेडियम नको, दररोज पाणीपुरवठा करा!

motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Nitin Raut Car Accident nagpur Maharashtra Assembly Election 2024
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात
traffic congestion, Parking problem APMC navi mumbai double parking, trucks
एपीएमसीतील पार्किंग समस्या जटिल, ट्रकच्या दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित

पिंपळेसौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीचे काम सुरु आहे. इमारतीसाठी खोल खड्डा खोदण्यात आला आहे. त्याच्या चारही बाजुंनी पायलिंग केले. पण, ते निकृष्ट दर्जाचे असल्याने महापालिकेचा १५ फूट रस्ता खचला. घटना सकाळी घडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पण, महापालिकेची जलवाहिनी फुटली आहे. महापालिकेने बांधकाम व्यावसायिकाकडून जलवाहिनी आणि रस्ता दुरुस्तीचा खर्च घेतला आहे.

महापालिकेने बांधकाम व्यावसायिक घनश्याम सुखवानी, संजय रामचंदानी यांना नोटीस बजाविली आहे. पायाचे खोदकाम करताना ५० ते ६० मीटर लांबीची संरक्षक भिंत ढासळून रस्ता खचला. त्यामुळे पाण्याची ३०० व्यासाची जलवाहिनी, पावसाळी पावसाची वाहिनी,  ड्रेनेज लाइन, वीजवाहिनी तुटली आहे. यामुळे लोकांच्या संरक्षणास बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे बांधकाम तत्काळ बंद करावे. नकाशाप्रमाणे सीमाभिंत बांधवी. स्ट्रॉम वॉटर वाहिनी, पाण्याची जलवाहिनी, इतर सेवावाहिन्या दुरुस्त करुन रस्ता पूर्ववत वाहतुकीस उपलब्ध करुन द्यावा. सुरक्षाकडे बसवून हे काम करावे. रात्रीच्या वेळेस अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. जीवित, वित्तहानी झाल्यास विकसक म्हणून सर्वस्वी जबाबदारी राहील. काम पूर्ण केल्याचा लेखी अहवाल महापालिकेला द्यावा. काम पूर्ण होईपर्यंत बांधकाम परवानगीस स्थगिती देण्यात आल्याचे नोटिसीत म्हटले आहे.

हेही वाचा >>> सावधान! फॉलकोडिनयुक्त औषधे धोकादायक; नशेसाठीही  होतोय वापर

दरम्यान, पिण्याचे पाणी, पावसाळी पाण्याची जलवाहिनी तुटल्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विकासकावर कारवाई करण्याबाबत महापालिकेचे उपअभियंता विनायक माने यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

रस्त्याला लागून कोणी बांधकाम इमारतीसाठी पाया खोदत असेल तर, त्यांना काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. विकसकांना दक्षता घेण्याबाबत नोटीस देण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.

डॉ. ज्ञानदेव जुंधारे- सह शहर अभियंता (पिंपरी-चिंचवड महापालिका)