पुणे : तब्बल साडेनऊ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या पुणे महानगरपालिकेचा कारभार आता अधिकाधिक पारदर्शक आणि गतिमान होणार आहे. मागील दोन वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू असून पालिका प्रशासनाला त्यामध्ये यश आले आहे. पुणे शहरात महापालिकेच्या वतीने केली जाणारी कामे नागरिकांना घरबसल्या पाहणे शक्य होणार आहे. पुढील काही महिन्यातच ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.

शहराचा चारही दिशांना होणारा विस्तार आणि वाढत असलेले नागरिकरण यामुळे आवश्यक त्या सोयी सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जातात. शहरातील विविध भागात ही कामे सुरू असतात. या कामांमध्ये पारदर्शकता यावी आणि ही कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण व्हावीत यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : पोलिसांचे चित्रीकरण केल्याप्रकरणी दाखल गुन्हा दोन वर्षांनी रद्द, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

महानगरपालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या विकासकामांची माहिती शहरवासीयांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने नवीन संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार केली आहे. ‘इंटेलिजेंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टिम’ (आयडब्ल्यूएमएस) असे या प्रणालीचे नाव असून, त्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. विकासकामाचा आराखडा तयार करण्यापासून संबंधित कामाचे अंतिम बिल देण्यापर्यंतची सर्व कामे ‘पेपरलेस’ होणार आहेत.

या नवीन प्रणालीमुळे पुढील महिनाभरात शहरवासीयांना त्यांच्या परिसरात महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची माहिती ऑनलाइन पाहता येणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून या प्रणालीचा वापर महापालिकेच्या कारभारात टप्प्याटप्प्याने केला जात असून, सद्य:स्थितीत ९० टक्के काम या माध्यमातून होत आहे. महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या कामामध्ये अधिकाधिक पारदर्शकता यावी; तसेच कमी वेळेत काम पूर्ण व्हावे या हेतूने ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी विविध विभागांची कामे करताना कामांचे नियोजन करणे, एकच काम दोनदा होऊ नये यासह डिफेक्ट लायबलिटी पीरियडमध्ये संबंधित कामात काही अडचण निर्माण झाल्यास ठेकेदाराकडूनच त्याची दुरुस्ती करवून घेणे सहजशक्य होणार असल्याचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.

हेही वाचा : कात्रज चौकाची ‘कोंडी’… वाहतुकीचा बोजवारा

दोन वर्षांपासून ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून, पालिकेतील सर्वच विभागांतील अभियंत्यांना त्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअर जी.आय.एस. प्रणालीसोबतदेखील जोडण्याची प्रक्रिया अंतिम करण्यात आली असून, चालू आर्थिक वर्षात ६ हजार १३१ कामांचा आराखडा या प्रणालीतून करण्यात आला. तसेच निविदा प्रक्रियेनंतर ४ हजार २७० विकासकामांंचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. या प्रणालीमध्ये काम करण्यापूर्वीचे, काम झाल्यानंतरचे छायाचित्रही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. प्रत्येक विभागाला दुसऱ्या विभागाची कामे, अंदाजपत्रकीय तरतूद या प्रणालीद्वारे समजणार असल्याने कामाचे आणि वेळेचे नियोजन करणे शक्य होणार आहे, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.

प्रणालीच्या ठळक बाबी

  • पारदर्शक प्रणालीमुळे चुकीच्या कामांना लगाम
  • शहरवासीयांना घरबसल्या आपल्या भागातील कामांची माहिती मिळणार
  • दुबार कामे रोखण्याबरोबरच कामातील गती आणि प्रगतीदेखील समजणार
  • काम सुरू असलेल्या ठिकाणी बारकोड उपलब्ध करून देण्यात येणार

Story img Loader