पुणे : मिळकत कर नियमित भरल्यानंतरही अतिरिक्त विलंब शुल्क आणि दंडाची नोटीस बजाविल्याप्रकरणी करदात्याने महापालिकेच्या विरोधात दाखल केलेला दावा लोक न्यायालायत तडजोडीत निकाली काढण्यात आला. करदाते जीजो मॅथ्यू यांनी २०१० पर्यंत नियमितपणे मिळकतकर बचत खात्यातून भरला होता. महापालिकेकडून त्यांना अतिरिक्त विलंब शुल्क आणि दंडाबाबत नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर मॅथ्यू यांनी पुणे महापालिकेविरुद्ध ग्राहक आयोगात दावा दाखल केला. हा दावा लोक न्यायालयात पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून तडजोडीतून निकाली काढण्यात आला.

हेही वाचा : Pune Winter News: पुणे गारठले; यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद

Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Budget Out of 36 thousand crores, only 18 thousand crores were spent Mumbai news
अर्थसंकल्पाचा फुगवटा यंदाही कायम? ३६ हजार कोटींपैकी केवळ १८ हजार कोटीच खर्च
Thane Municipal Corporation, action against unauthorized boards,
ठाणे महापालिकेची सुमारे चार हजार अनधिकृत फलकांवर कारवाई, तर ७६ गुन्हे दाखल
Akola Municipal Corporation privatization tax collection
करवसुलीच्या खासगीकरणाचा राज्यातील एकमेव प्रयोग फसला; अकोला महापालिकेपुढे आता…
Ramdas Athawale Devendra Fadnavis Mayor post pune corporation
‘ उपमहापौर’ केले आता ‘ महापौर’ करा, रामदास आठवलेंची मागणी ! मंत्रीमंडळात स्थान देऊन देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळावा
pimpri chinchwad municipal corporation administrative regime
प्रशासकीय राजवटीत विकासकामांना खीळ, पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत ९०० कोटी शिल्लक; नऊ महिन्यांत केवळ ३७ टक्के रक्कम खर्च
angry farmers attempted self immolation
चोरीला गेलेली गाय पाच महिन्यांतरही मिळाली नाही: संतप्त शेतकऱ्याचा पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

मॅथ्यू यांनी नियमितपणे मिळकत कर बचत खात्यामधून भरला. मात्र, त्यांनी भरलेला कर महापालिकेच्या नोंदीवर आला नाही. महापालिकेकडून मॅथ्यू यांनी कर न भरल्यामुळे अतिरिक्त विलंब शुल्क आणि दंडाबाबतची नोटीस बजाविण्यात आली. ही बाब मॅथ्यू यांनी ग्राहक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. ग्राहक आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर, सदस्य शुभांगी दुनाखे आणि सरिता पाटील यांच्यासमोर हे प्रकरण दाखल करण्यात आले. हे प्रकरण प्रलंबित असताना पुणे जिल्हा आयोगाने सामंजस्याने प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार शनिवारी पार पडलेल्या लोक न्यायालयात हे प्रकरण निशांत अर्धापुरे आणि नीरेश भरते यांच्याकडे वर्ग करण्यात आले. लोक न्यायालायत संबंधित पॅनेलच्या सदस्यांनी उभय पक्षात तडजोड केली. महापालिकेडून ॲड. ऋषिकेश गानू यांनी काम पाहिले. महापालिकेच्या विधी विभागाच्या मुख्य सल्लागार म्हणून ॲड. निशा चव्हाण यांनी सहाय केले.

हेही वाचा : गायक संजय मराठे यांचे निधन

याप्रकरणात महापालिकेच्या कर विभागाने बारकाईने पडताळणी केली. तेव्हा मॅथ्यू यांनी मिळकत कर भरल्याचे आढळून आले. मॅथ्यू यांनी अतिरिक्त कर भरला होता. अतिरिक्त करापोटी भरण्यात आलेली एक लाख ९५ हजार ६१२ रुपयांची रक्कम त्यांना धनादेशाद्वारे देण्यात आली, तसेच कर भरण्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले.

Story img Loader