लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आंबेगाव पठार येथे एका लहान मुलावर भटक्या श्वानांनी हल्ला चढवून जबर जखमी केले. शहरात भटक्या श्वानांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच असून, भटके श्वान चावल्याच्या दरमहा सरासरी दोन हजार घटना घडत आहेत. भटक्या श्वानांच्या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

Auction of Walmik Karad flat averted in Pimpri Chinchwad
पिंपरी- चिंचवमधील वाल्मिक कराडच्या फ्लॅटचा लिलाव तूर्तास टळला; वाल्मिकचे दोन फ्लॅट असल्याचं झालं होतं उघड
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Pimpri Municipal Corporation, transfers officers,
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रलंबित; बदली धाेरणाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ?
Pune Municipal Corporation takes action against seven private hospitals in Pune for violating rules Pune print news
पुण्यातील सात खासगी रुग्णालयांकडून नियमभंग! महापालिकेने उचलले कारवाईचे पाऊल 
Nagpur municipal corporation
नागपूर : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उपद्रव शोध पथक सक्रिय
Navi Mumbai corporation new policy car Parking problem
नवी मुंबईत पार्किग कोंडीवर अखेर उतारा, महापालिकेच्या नव्या धोरणात मुबलक पार्किंगचे नियोजन
Ganesh Naik talk about human and wildlife conflict and Solution plan
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले “वाघ मुंबईपर्यंत आले तर काय…”
pune Municipal Corporation plans to open Pimpri flyover by March
पिंपरी : डेअरी फार्म येथील उड्डाणपूल मार्चअखेर खुला?

आंबेगाव पठार येथे शुक्रवारी सकाळी पार्किंगमध्ये खेळत असलेल्या एका लहान मुलावर दोन ते तीन भटक्या श्वानांनी हल्ला केला. भारती विद्यापीठाच्या मागे असलेल्या चंद्रांगण सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. हल्ल्यात जखमी झालेल्या मुलावर भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेने या घटनेची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

आणखी वाचा-स्वच्छ भारत अभियानासाठी महापालिका करणार ‘ हे ‘ काम ! परिमंडळनिहाय सर्वंकष स्वच्छता मोहीम स्पर्धा घेण्याची तयारी

लहान मुलावर श्वानाने केलेल्या हल्ल्याच्या या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी खासगी डॉग रेस्क्यू टीमला बोलाविले. तसेच, भटके श्वान पकडण्यासाठी स्थानिक नागरिकदेखील रस्त्यावर उतरले. काही श्वान पकडून महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले. या भागात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या श्वानांचा त्रास वाढला असून, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.

आंबेगाव पठार भागात गेल्या महिनाभरात ३० श्वानांचे लसीकरण करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच, या भागात भटके श्वान पकडण्यासाठी दोन स्वतंत्र गाड्यांची आणि लसीकरणासाठी एका गाडीची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे-भोसले यांनी दिली.

आणखी वाचा-पिंपरी : लिफ्टमध्ये घुसून शिक्षिकेला हातोडीने मारहाण

शहरातील अनेक भागांत भटक्या श्वानांची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. भटक्या श्वानांना पकडून त्यांची नसबंदी करण्यासाठी महापालिकेकडून नियोजन केले जाते. एप्रिल २४ ते नोव्हेंबर २४ या आठ महिन्यांच्या काळात महापालिकेने १६ हजार ४७९ श्वानांना पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करून त्यांचे लसीकरण केले आहे, असे भोसले यांनी सांगितले.

वसंत मोरे यांचे महापालिकेला निवेदन

शिवसेनेचे (ठाकरे गट) वसंत मोरे यांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली. याविषयी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले असून, मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याबरोबरच डॉग पार्क आणि डॉग शेल्टरचे काम मार्गी लावण्याची मागणी केली. ‘महापालिकेच्या शिंदेवाडी येथील जुन्या जकात नाक्याची जागा अशा उपद्रवी भटक्या श्वानांच्या उपचार व देखरेखीसाठी द्यावी, अशी मागणी मार्च २०२३ मध्ये प्रशासनाकडे केली होती. मात्र त्यावर अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही,’ असे मोरे म्हणाले.

आणखी वाचा-पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, तिघे जखमी

रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अधिक त्रास

शहरातील अनेक भागांत रात्रीच्या वेळी भटक्या श्वानांचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. हे श्वान वाहनचालकांच्या दिशेने भुंकत आणि धावत जात असल्याने अनेकदा अपघात घडत आहेत. गेल्या आठवड्यात आळंदी येथेदेखील भटक्या श्वानाने अनेकांना चावा घेतल्याचा प्रकार घडला होता.

भटके श्वान पकडल्याचा पालिकेचा दावा

आंबेगाव पठार येथील घटनेनंतर महापालिकेच्या पथकाने या भागात कारवाई करून माेकाट श्वानांना पकडल्याचा दावा केला जात आहे. गेल्या २० दिवसांत या भागातील २१८ श्वानांना पकडून त्यांची नसबंदी, लसीकरण केले आहे. तसेच, सध्या या भागातील १८ श्वान लसीकरण आणि नसबंदी करण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात असल्याचा दावा केला जात आहे.

Story img Loader