पुणे : खासगी रुग्णालयांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे राज्य पातळीवर खासगी रुग्णालयांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आठवडाभरात सुमारे १३५ खासगी रुग्णालयांची तपासणी केली आहे. यात ७ रुग्णालयांनी नियमांचे पालन केले नसल्याचे समोर आले असून, त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी केली जात आहे. त्यात खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आणि किमान एक रुग्णशय्या असलेल्या रुग्णालयांचा समावेश आहे. याचबरोबर ॲलोपथी, आयुष, युनानी, नॅचरोपथी यासह सर्व शाखांच्या रुग्णालयांची तपासणी केली जात आहे. रुग्ण २४ तास दाखल करून घेतला जात नाही, अशा डे केअर सेंटरचा यात समावेश नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय आरोग्य अधिकारी, परिचारिका आणि कर्मचारी अशा तीन जणांच्या पथकावर तपासणीची जबाबदारी सोपविली आहे. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांत अशी १५ पथके रुग्णालयांची तपासणी करीत आहेत.

Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Saif Ali Khan attacked by intruder at bandra home
मोठी बातमी! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
Pimpri, entrepreneur , LBT ,
पिंपरी : उद्योजकांमागे ‘एलबीटी’चे शुक्लकाष्ट, महापालिकेकडून ७२ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा

हेही वाचा >>>पिंपरी : उद्योजकांमागे ‘एलबीटी’चे शुक्लकाष्ट, महापालिकेकडून ७२ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा

आरोग्य विभागाने आठवडाभरात सुमारे १३५ रुग्णालयांची तपासणी केली. त्यात ७ रुग्णालयांनी नियमांचे पालन केले नसल्याची बाब निदर्शनास आली. या रुग्णालयांना आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. रुग्णालयाची बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार नोंदणी झाली आहे का, याची तपासणी केली जात आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांची निकषाप्रमाणे संख्या आणि रुग्णालयाबाहेर लावलेले दरपत्रक या बाबींची तपासणी करण्यात येत आहे. रुग्णालयाकडील अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीबद्दल माहिती घेतली जात आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी सूर्यकांत देवकर यांनी दिली.

महापालिकेककडून खासगी रुग्णालयांची तपासणी मोहीम सुरू असून, उपचारांचे दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, रुग्ण हक्क संहिता नसणे यासह इतर नियमांचे पालन होत नसल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले. या प्रकरणी ७ रुग्णालयांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.- डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका

खासगी रुग्णालयांची तपासणीची आवश्यकता नाही. कारण सहा महिन्यांपूर्वी शहरातील निम्म्या रुग्णालयांनी नियमांची पूर्तता करून परवाना नूतनीकरण केले होते. आता उरलेली निम्मी रुग्णालये परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही नियमांची पूर्तता आधीच करण्यात आली आहे.- डॉ. संजय पाटील, राष्ट्रीय सचिव, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया

Story img Loader