पुणे : चालू आर्थिक वर्षातील मिळकतकराच्या देयकापोटी धनादेश दिलेल्या, मात्र तो न वटलेल्या मिळकतधारकांवर शनिवारपासून कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने घेतला आहे. कलम १३८ अन्वये ही कारवाई करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख आर्थिक स्रोत आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मिळकतकर काही मिळकतधारकांनी धनादेशाद्वारे भरला होता. एक एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत न वटलेल्या धनादेशांची संख्या एकूण १ हजार ९६८ एवढी असून ८ कोटी ३३ लाख, ९३ हजार ८४३ एवढ्या रकमेची मागणी आहे. त्यापैकी कर आकारणी आणि कर संकलन विभागाने त्यापैकी १ हजार २९२ धनादेशाची एकूण ४ कोटी ५७ लाख ३५ हजार ३१७ एवढी रक्कम वसूल केली आहे.

हेही वाचा…पिंपरी: मेट्रोचा महापालिकेच्या जागांवर डोळा, आता…

उर्वरीत १४७ मिळकतधारकांना कलम १३८ अन्वये नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांच्यावर न्यायालयात दावा दाखल करण्याची प्रक्रियाही प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation to take action against uncashed income tax checks under section 138 pune print news apk 13 psg