पुणे शहरातील अनेक भागात सकाळच्या प्रहरी पारव्यांना तसेच कबुतरांना खाण्यासाठी धान्य टाकले जाते. पक्षांना खायला घातले की पुण्य मिळते, या आशेने अनेक पक्षीप्रेमी सर्रासपणे पक्षांसाठी धान्य टाकत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. खाण्यासाठी धान्य मिळत असल्याने पारवे आणि पक्षी मोठ्या संख्येने गोळा होतात. याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना सहन करावा लागतो.

पक्ष्यांना उघड्यावर खायला देऊ नये, असे आवाहन यापूर्वी महानगपालिकेतर्फे करण्यात आलेले आहे. पारव्यांमुळे वेगवेगळे श्वसनाचे आजार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोणीही त्यांना खाण्यासाठी रस्त्यावर धान्य टाकू नये असे आवाहन करत उघड्यावर पक्षांना खायला देताना आढळल्यास संबधित नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा देखील महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आता महापालिकेने याबाबत जनजागृती करत उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.

Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Akali Leader Sukhbir Singh Badal Attacked at Goldan Temple
Sukhbir Singh Badal Firing : सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार! घटनेचा थरारक Video आला समोर
Case filed for filming police officers dismissed after two years
पोलिसांचे चित्रीकरण केल्याप्रकरणी दाखल गुन्हा दोन वर्षांनी रद्द, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
dogs in Chernobyl
किरणोत्सर्गामुळे कुत्र्यांमध्ये उत्परिवर्तन? चेर्नोबिलचे ‘म्युटंट’ कुत्रे का बनलेत संशोधकांसमोर कोडे?

हेही वाचा >>>कारावास भोगलेल्या नागरिकांना निवृत्तीवेतन

बिबवेवाडीतील डॉल्फिन चौकात पारव्यांचा (कबुतरे) त्रास वाढत असल्याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारींना ‘लोकसत्ता’ने ‘तगादा’ सदरातून नुकतीच वाचा फोडली होती. त्यानंतर पुणे महापालिकेला जाग आली असून, या ठिकाणी पारव्यांसह इतर पक्ष्यांना खाद्य टाकण्यासाठी केलेली व्यवस्था अखेर पालिकेने हिरवे कापड टाकून झाकली आहे.

पक्ष्यांना उघड्यावर खायला देऊ नये, यासाठी महापालिका नागरिकांमध्ये जनजागृती करते. शहरभरात सध्या तसे फलक लावण्यास महापालिकेने सुरुवातही केली आहे. डॉल्फिन चौकातही हे फलक लावण्यात आले असून, या पक्ष्यांना उघड्यावर खायला घालणाऱ्या पक्षिप्रेमींवर कारवाई करण्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे.

हेही वाचा >>>पीएमआरडीएच्या हद्दीत दशकभरात सुमारे दहा हजार अनधिकृत बांधकामे झाली असल्याचे आता उघड

जे नागरिक रस्त्यांवर पक्ष्यांसाठी धान्य टाकतात, त्यांच्यावर पालिकेचा आरोग्य विभाग दंडात्मक कारवाई करते. मात्र, पालिकेच्या पथ विभागाला याचा विसर पडला होता. काही रस्त्याचे सुशोभीकरण करण्याच्या निमित्ताने बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील डॉल्फिन चौकात चक्क पक्ष्यांना खाद्य टाकण्यासाठीची व्यवस्था निर्माण केली गेली. परिणामी, तेथे पारव्यांचा त्रास वाढला. ‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेच्या या कृतीवर विविध स्तरांतून टीका करण्यात आली.

पारव्यांची विष्ठा, तसेच इतर घातक गोष्टींमुळे हायपर सेन्सेटिव्ह न्यूमोनिया, दमा असे फुफ्फुसांशी संबंधित आजार होत असल्याचे डॉक्टरांनी केलेल्या पाहणीमध्ये समोर आले आहे. त्यामुळे पक्ष्यांना उघड्यावर खायला टाकू नये, असे आवाहन पालिकेच्याच आरोग्य विभागाकडून केले जाते. मात्र, शहरातील विविध भागांत मोकळ्या जागांवर पक्ष्यांना खाण्यासाठी सर्रास धान्य टाकले जाते. ‘लोकसत्ता’ने यावरदेखील नागरिकांची भूमिका मांडून पालिका प्रशासनाला प्रश्न विचारले होते.

जनजागृती फलकावर आजारांची माहिती

बिबवेवाडी भागातील डॉल्फिन चौकातील सुशोभीकरण केलेल्या जागेवर महापालिकेने आता पारव्यांना बसता येऊ नये, अशी उपाययोजना केली आहे. तसेच, या भागात पारव्यांना धान्य न टाकण्याबाबत फलकदेखील लावले आहेत. पारव्यांच्या विष्ठेमुळे तसेच पिसांमुळे काय आजार होतात, याची माहिती या फलकांवर आहे. अशीच उपाययोजना शहरातील इतर भागांमध्येदेखील करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पारव्यांची विष्ठा आणि त्यांच्या पंखातील धुळीतून अनेक आजार पसरतात. याचबरोबर बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. हे घटक श्वसनाच्या माध्यमातून थेट फुफ्फुसात जात असल्यामुळे तेथे जंतुसंसर्ग होतो. यातून फुफ्फुसे निकामी होण्याचा धोका निर्माण होतो.- डॉ. संजय गायकवाड,श्वसनविकार तज्ज्ञ, ससून सर्वोपचार रुग्णालय

Story img Loader