पुणे: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील घटत्या पाणीसाठ्यामुळे पाणीकपातीची टांगती तलवार असताना पाणी बचतीला महापालिकेने प्राधान्य दिले आहे. पुणे कॅन्टोन्मेंट ते फुरसुंगी जलवाहिनीतून १५० दशलक्ष लीटर पाण्याबरोबरच पाणीपुरवठा यंत्रणेतून ५० दशलक्ष अशा एकूण २०० दशलक्ष लीटर पाण्याची बचत करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत असल्याने शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेने पाण्याचा दैनंदिन वापर मर्यादित ठेवण्याबाबतच्या सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्राद्वारे दिल्या आहेत. शहराची तहान भागविण्यासाठी प्रतिदिन १ हजार ६५० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. खडकवासला प्रकल्पात २४.१० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक असला, तरी त्यापैकी ८.५४ टीएमसी पाणी रब्बी हंगामासाठी आरक्षित आहे. त्यामुळे शहरासाठी असलेल्या १५.५० टीएमसी पाणीसाठ्याचे जूनपर्यंतचे नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे.

हेही वाचा… मागासवर्ग आयोगाची पुण्याऐवजी तातडीने नागपुरात बैठक; काय आहे कारण?… मराठा समाजाबाबत महत्त्वाचे निर्णय होणार का?

सध्याच्या पाणी वापराचा विचार करता पुढील २४४ दिवसांसाठी दैनंदिन वापर १ हजार २५० ते १ हजार ३०० एमएलडी केल्यास २.८० टीएमसी ते ३.२३ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र देऊन दैनंदिन १ हजार २०० एमएलडी पाणी वापर करावा, अशी सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरठा विभागाने पाणीबचतीला प्राधान्य दिले असून आगामी पाणीटंचाई संकटाच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी कपात न करता योग्य व्यवस्थापनाद्वारे २०० एमएलडी पाण्याची बचत केली जाणार आहे.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवड महापालिकेत ६७१ कोटींचा ‘टीडीआर’ घोटाळा; आयुक्तांसह…

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या फुरसुंगी गावाला लवकरच जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्यामुळे १५० एमएलडी एवढ्या पाण्याची बचत होणार आहे. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दैनंदिन २० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी फुरसुंगीला कालव्यातून पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र, त्यासाठी १७२ दशलक्ष लीटर पाणी कालव्यातून सोडावे लागत होते. त्यापैकी १५० दशलक्ष लीटर पाण्याची गळती होत होती. हे काम लवकर पूर्ण झाल्यानंतर १५० एमएलडी पाणी शहरासाठी वापरण्यात येणार आहे. पाणी वितरण व्यवस्थेत बदल करून ५० एमएलडी पाणी बचतीचेही नियोजन करण्यात आले आहे. अशा एकूण २०० एमएलडी पाण्याची बचत करत पाणीकपातीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली.